Kushal Badrike | अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणारा तसेच खळखळून हसवणारा मराठमोळा अभिनेता कुशल बद्रिके कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. चला हवा येऊ द्या या टेलिव्हिजन शो मुळे त्यांनी प्रत्येकाच्या मनात घर केलं. या शोमध्ये त्यांनी अनेक दिग्गज कलाकारांची भूमिका साकारत अवघ्या महाराष्ट्राला वेड लावलं. लहाणांपासून ते वृद्धांपर्यंत आज कुशलचे फॅन आहेत. मात्र कुशलने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून एक भावनिक पोस्ट शेअर केली ज्याची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे.
काय म्हणाला कुशल बद्रिके?
गेल्या अनेक वर्षांपासून झी मराठी वाहिनीवरील सुप्रसिद्ध टेलिव्हिजन शो चला हवा येऊ द्याने प्रेक्षकांना खिळून ठेवलं. यामधील सगळ्या कलाकारांनी मराठी माणासांच्या मनातमध्ये आपलं नाव कोरलं आहे. दरम्यान, शोमधील प्रसिद्ध अभिनेता कुशल बद्रिकेनी (Kushal Badrike) त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरुन एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये त्यांने म्हटलं की, “निरोप घेतो आता आम्हा आज्ञा असावी. चुकले आमुचे काही आम्हा क्षमा असावी”.
पुढे तो म्हणाला की, माय बाप प्रेक्षकहो, सगळ्यांचे मनापासून आभार. “चूक भूल द्यावी घ्यावी” असं म्हणत कुशलने चला हवा येऊ द्याच्या सेटवरचा व्हीडिओ शेअर केलाय. त्याचा हा व्हीडिओ पाहून प्रेक्षकही भावूक झाले आहेत. त्यांनी कुशलच्या व्हीडिओवर कमेंट केल्या आहेत.
View this post on Instagram
अभिनेत्याची कमेंट-
कुशलने (Kushal Badrike) पोस्ट केलेल्या व्हिडीओवर त्याच्या चाहत्यांनी तर कमेंटस केल्याच मात्र, मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने देखील कुशलच्या पोस्टवर कमेंट केली आहे. संतोष म्हणला की, “तुम्ही परत येणार सगळे नवीन रूपात नवीन जोमात. पुराना जायेगा तभी तो नया आयेगा. Love u all आणि खूप खूप प्रेम तुम्ही सगळ्यांनी खूप हसवून हसवून आठवणी आणि हसण्याचे क्षण आम्हाला दिले आहेत”.
व्हिडीओवर कमेंटस-
गेल्या 10 वर्षा मधे आम्हाला आमची दुःख विसरून चेहऱ्यावर हसू आणल्याबद्दल धन्यवाद. यापुढे पण असंच तुम्ही आम्हाला हसवत राहणार ही गॅरंटी आहे. धन्यवाद… आणि पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे.
News Title : kushal badrike shares emotional post
महत्त्वाच्या बातम्या-
मोठी बातमी! हवामान विभागाकडून ‘या’ भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी
मतदान यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही अशाप्रकारे तपासा!
प्रसिद्ध अभिनेत्रीचं पंतप्रधान मोदींबद्दल मोठं वक्तव्य; थेट म्हणाली..
शाहरुख खानच्या मुलीचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल; सगळीकडे एकच खळबळ
रशियात पुन्हा पुतिनराज!; विजयानंतर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, भारताची चिंता वाढली