मोठी बातमी! हवामान विभागाकडून ‘या’ भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

Maharashtra Weather Update | ऐन उन्हाळ्यात पाऊस पडत असल्याने शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. मार्च महिन्याच्या सुरुवातीला तापमानात वाढ होताना दिसली. बऱ्याच ठिकाणी उकाडाही वाढला आहे. दिवसा घरातून बाहेर पडणंही अवघड झालं आहे.

अशात काही ठिकाणी अवकाळी पाऊस झाला आहे. त्यामुळे नेमका ऋतु कोणता सुरुये, हाच प्रश्न पडला आहे. शनिवारी काही ठिकाणी जोरदार पाऊस पडला. विदर्भामध्ये यामुळे मोठं नुकसान झालं आहे. आता हवामान विभागाने पुन्हा एकदा पावसाचा इशारा दिला आहे.

आजपासून (18 मार्च) ते 21 तारखेपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पुन्हा चिंता वाढली आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे.

‘या’ भागांना इशारा

हवामान विभागाने विदर्भामधील गोंदिया, वर्धा, नागपूर, अमरावती, यवतमाळ, गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा दिला आहे. तर आज गोंदिया, वर्धा, यवतमाळ जिल्ह्यात गारपीट होण्याची शक्यता (Maharashtra Weather Update ) वर्तवण्यात आली आहे.

यामुळे काही जिल्ह्यांना यलो अलर्ट तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. राज्यात विदर्भात आणि मराठवाड्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये 17 ते 20 तारखे दरम्यान व मध्य महाराष्ट्राच्या दक्षिण भागात 19 तारखेला तूरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता सांगितली आहे.

मराठवाड्यामधील लातूर आणि नांदेडमध्ये आज पाऊस पडू शकतो. तर भंडारा, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व यवतमाळ या भागांमध्ये 17 मार्च ते 19 मार्चदरम्यान विजांचा कडकडाट व सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.

News Title : Maharashtra Weather Update

थोडक्यात बातम्या-

“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला