वजन कमी करायचंय आणि डाएटही नको?, मग ही बातमी तुमच्यासाठीच

Weight Loss Juices | बऱ्याच जणांना अति वजन असल्याने अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. वजन जास्त असल्याने अनेक गंभीर आजार देखील होतात. वजन कमी करण्यासाठी मग जीम लावले जातात. महागडे औषधी खाल्ली जातात. किंवा मग काही व्यक्ती डाएट करतात.

डाएटमध्ये अनेक पदार्थ खाणे टाळले जातात. कधी कधी तर चुकीचा डाएट प्लान तयार झाला तर त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागतो. त्यामुळे डाएट करताना शक्यतो विचार करूनच करायला हवा. मात्र, तुम्हाला जर लवकर वजन कमी करायचं असेल आणि डाएटही नको असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

डाएट न करताही वजन कमी करता येऊ शकतं. हे खरं आहे, कारण वजन कमी करण्याच्या नादात बरेच व्यक्ती पौष्टिक घटक टाळतात. यामुळे वजन तर कमी होते मात्र, कमजोरी येते. शरीरावर त्याचे परिणाम दिसू लागतात. तुम्हाला आता वजन कमी करण्याचा एक सोपा उपाय सांगणार आहोत. काही भाज्यांच्या ज्यूसचे सेवन केल्याने तुमचे वजनही कमी होईल आणि तुमच्या शरीराला पौष्टिक घटक देखील मिळतील.

दुधीभोपळ्याचा रस

अ, ब आणि क जीवनसत्त्वांबरोबरच इतर अनेक आवश्यक खनिजे युक्त दुधीभोपळ्याचा रस अत्यंत फायदेशीर आहे. याचा रस पचन व्यवस्थित ठेवते आणि पोटाच्या समस्या दूर ठेवते. याशिवाय याच्या रसमध्ये भरपूर फायबर, प्रोटीन आणि पोटॅशियम असते, ज्यामुळे शरीरातील चरबी कमी होते.

पालक ज्यूस

पालक ही अनेक प्रकारच्या (Weight Loss Juices)  पोषक तत्वांनी समृद्ध असलेली अतिशय फायदेशीर भाजी आहे, ती खाल्ल्याने किंवा त्याचा रस प्यायल्याने अनेक फायदे दिसून येतात. पालकमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे, प्रथिने आणि फायबर असतात. पालकाच्या ज्यूसमध्ये कॅलरीज खूप कमी असतात, त्यामुळे त्याचा आहारात समावेश केल्यास वजन कमी होण्यास मदत होते.

काकडीचा ज्यूस

उन्हाळ्यात काकडी खाल्ल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहते. काकडीच्या रसात अनेक पोषक घटक असतात. त्याचा रस प्यायल्याने शरीर हायड्रेट राहते, पचनाशी संबंधित समस्या दूर होतात आणि वजनही नियंत्रणात राहते. इतकेच नाही तर काकडीचा रस प्यायल्याने त्वचेवर चमकही येते.

गाजर ज्यूस

गाजर जवळजवळ (Weight Loss Juices) प्रत्येक हंगामात उपलब्ध असतो. यामध्ये फायबर, जीवनसत्त्वे आणि इतर अनेक पोषक तत्व असतात. गाजरामध्ये पेक्टिन असते. यामुळे शरीरातील रक्तातील साखर कमी होते आणि मधुमेहासारख्या समस्यांचा धोका कमी होतो. गाजराचा रस प्यायल्याने पचनक्रिया सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.

News Title : Weight Loss Juices
महत्वाच्या बातम्या- 

“जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते”, भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

अश्विनचा ‘भारी’ सत्कार! 500 सोन्याची नाणी आणि 1 कोटी रुपये, भेटवस्तूंचाही वर्षाव

RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!

“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर