“माझी लायकी काय हे पण सांगतो…”, विजय शिवतारेंचा अजित पवारांना इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Shivtare | शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे सध्या चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना गंभीर इशारा दिला आहे. बारामतीच्या उमेदवारीवरून सध्या शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात वादविवाद सुरू आहेत. विजय शिवतारे (Vijay Shivtare) यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे.

यामुळे शिवतारे यांनी थेट अजित पवार यांना आव्हान दिलं आहे. त्यांनी या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली असून या भेटीनंतर ते आक्रमक दिसून आले. त्यांनी कोण विजय शिवतारे, त्याची लायकी काय असं विचारणारे अजित पवार आता का घाबरले आहेत?, असा सवाल करत गंभीर इशारा दिला आहे.

विजय शिवतारे यांचा इशारा

अजित पवार म्हणाले होते की विजय शिवतारे (Vijay Shivtare) तुझा आवाका किती? तू करतोय काय? तुला बघतोच. आता अजित पवारांना माझा आवाका दाखवतोच. मी एवढा लहान आहे, माझी लायकी काय हे पण सांगतो. अशी टीका करणारे अजित पवार आता एवढं का घाबरत आहेत?,

आता मी त्यांना माझी लायकी, माझा आवाका दाखवणारच, असा इशाराच विजय शिवतारे यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना कल्पना दिलीये. त्यांनी मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे. मी नसलो तरी अजित पवार निवडून येत नाहीत. युतीची सीट जाणार. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे, अशी टीकाही शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली आहे.

बारामतीत अजित पवारांचा पराभव निश्चित

अजित पवार बारामतीमधून निवडून येणारच नाहीत. मुख्यमंत्र्यांनी मला बारामतीची गणितं समजावून सांगितली आहेत. इथली युतीची  जागा जाणार. मी साहेबांना सांगितलंय, मी आपल्या शब्दाबाहेर जाणार नाही. पण, जनतेचा शब्दही तेवढाच महत्वाचा आहे. असं शिवतारे (Vijay Shivtare) म्हणाले आहेत.

येत्या दोन चार दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे.आता पुण्याला गेल्यावर पुढची दिशा ठरवणार. बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात खूप रोष आहे. त्यामुळे येथे त्यांचा विजय अशक्यच आहे. अशी टीका शिवतारे यांनी केली आहे. त्यांच्या या वक्तव्याची आता चर्चा होत आहे.

News Title-  Vijay Shivtare on ajit pawar  

महत्त्वाच्या बातम्या –

“प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते..”, सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ

…भर स्टेडिअमवर स्मृतीच्या बॉयफ्रेंडने मारली घट्ट मिठी; फोटो तुफान व्हायरल

पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारच्या या योजनेद्वारे नागरिकांना मिळणार मोफत वीज! असा करा अर्ज

Vivo कंपनीच्या या सीरीजवर मिळतोय बंपर डिस्काउंट; या तारखेपर्यंत खरेदी करू शकता