पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Nitin Gadkari | अनेकदा नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांचं नाव हे देशाचे भावी पंतप्रधान म्हणून संबोधले जाते. त्यांच्या कामाचा आवाका पाहिल्यास ते देशाचे पंतप्रधान होऊ शकतात, अशी चर्चा आहे. त्यांची तुलना ही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत केली जाते. यावर आता स्वत: नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले नितीन गडकरी?

नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची पंतप्रधानपदावरून नेहमी चर्चा होते असते. त्यावर नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी स्वत: प्रतिक्रिया दिली आहे. गडकरी म्हणाले की, “मी कधीही पंतप्रधानपदाच्या शर्यतीमध्ये नव्हतो. मी आज जसा आहे तसा संतुष्ट आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून दृढ विश्वासाने काम करतो,” असं मत नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी मांडलं आहे.

“कोणत्याही मतभेदांच्या बातम्यांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. मी राजकारणामध्ये करिअर करायला आलो नाही. मी कार्यकर्ता म्हणून काम करत आहे आणि स्वयंसेवक म्हणून काम करणं पसंत आहे. भाजपचा कार्यकर्ता म्हणून मी काम करतो हिशोब तपासणारा मी नेता नाही”, असं म्हणत नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“सबका साथ सबका विकासवर विश्वास”

“सबका साथ सबका विकास यावर नितीन गडकरी यांनी विश्वास ठेवला आहे. एनडीए सरकार चांगल्या पद्धतीनं काम करत असल्याचं नितीन गडकरी म्हणाले आहेत. जेव्हा एकाच क्षेत्रामध्ये दोन मोठे नेते असतील तर अशा अफवा निर्माण होतात, आपण केंद्रामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापन करू,” असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यात मतभेद?

देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये मतभेद असल्याच्या चर्चा आहेत, यावरही नितीन गडकरी उत्तरले आहेत. “महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आणि माझ्यात मतभेद असल्याच्या चर्चा आहेत. फडणवीस यांनी राजकारणामध्ये प्रवेश करण्याआधी मी त्यांच्या वडिलांची भेट घेतली होती. एकाच क्षेत्रामध्ये दोन लोकं काम करत असतील कर अशा घटना घडताना दिसतात”, असं गडकरी म्हणाले.

“आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील माझा सल्ला घेतात. फायदा तोट्याचा विचार करून निर्णय घ्या, मी त्यांना सांगतो”, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

News Title – Nitin Gadkari Speak About Race for post prime minister

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: इलेक्टोरल बाँडवर ‘सर्वोच्च’ सुनावणी; CJI म्हणाले, “SBI ला माहिती द्यावीच लागेल”

तरुणांनो ही सुवर्णसंधी सोडू नका; इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत ‘इतक्या’ पदांसाठी भरती सुरु

LIC च्या या जबरदस्त योजनेमुळे तुम्ही व्हाल मालामाल!

“काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल”, भाजपची बोचरी टीका

‘मला तुरुंगात जायचं नाही असं…’; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट