LIC च्या या जबरदस्त योजनेमुळे तुम्ही व्हाल मालामाल!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

LIC Index Plus l देशातील सर्वात मोठी विमा कंपनी म्हणजेच LIC एक नवीन योजना घेऊन आली आहे. या योजनेद्वारे गुंतवणूकदारांना शेअर बाजारातून मोठा नफा मिळणार आहे. LIC च्या या नवीन प्लॅनचे नाव LIC Index Plus असे आहे. ही योजना अशा व्यक्तींसाठी आहे ज्यामध्ये गुंतवणूकदारांना नियमितपणे प्रीमियम भरावा लागेल. एलआयसीच्या या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे ती संपूर्ण पॉलिसी कालावधीसाठी बचतीसह जीवन विमा संरक्षण प्रदान करते. तर आज आपण एलआयसीच्या या विशेष योजनेबद्दलची माहिती जाणून घेऊयात…

LIC Index Plus l लॉक इन कालावधी किती आहे? :

LIC Index Plus या योजनेचा लॉक इन कालावधी 5 वर्षांचा आहे. त्यानंतर पॉलिसीधारकाला काही अटी दिल्या आहेत. एलआयसीने सांगितले की, वार्षिक प्रीमियमची टक्केवारी म्हणून मोजले जाणारे हमी अतिरिक्त पैसे उर्वरित पॉलिसी वर्षानंतर युनिट फंडात जोडले जाणार आहेत.

LIC Index Plus चे नियम काय आहेत? :

– विमा योजनेसाठी पॉलिसीधारकाचे वय किमान 90 दिवस असावे.
– पॉलिसी धारकाच्या रकमेनुसार वय 50 किंवा 60 वर्षांपर्यंत असू शकते.
– ज्या पॉलिसीधारकांचे वय 90 दिवस ते 50 वर्षांच्या दरम्यान आहे त्यांच्यासाठी मूळ विमा रक्कम वार्षिक प्रीमियमच्या 7 ते 10 पट दरम्यान निश्चित केली जाते.
– विमा पॉलिसीचा प्रीमियम पॉलिसीधारकाच्या वयाच्या आधारे ठरवला जातो.

LIC Index Plus l प्रीमियम किती असणार? :

– विमा योजना वार्षिक प्रीमियमवर अवलंबून असते. जास्तीत जास्त 25 वर्षे आणि किमान 10 ते 15 वर्षांसाठी आहे.
– पॉलिसीचा कालावधी प्रीमियम पेमेंट कालावधीशी जुळणे खूप महत्वाचे आहे.
– जर गुंतवणूकदारांनी वार्षिक पेमेंट केले तर तुम्हाला 30 हजार रुपये द्यावे लागतील.
– 6 महिन्यांतून एकदा पैसे भरणाऱ्यांना 15,000 रुपये भरावे लागतील.
– त्रैमासिक पेमेंट करणाऱ्या पॉलिसीधारकाचा निश्चित प्रीमियम रु. 7,500 आणि मासिक प्रीमियम रु. 2,500 असणार आहे.
– तुम्ही या 2 फंडांमध्ये गुंतवणूक करू शकता.
– या योजनेत पॉलिसीधारकांना दोन फंडांमधील पर्याय असेल ज्यामध्ये ते प्रीमियम गुंतवू शकतात.
– LIC ने दिलेले दोन पर्याय म्हणजे Flexi Growth Fund आणि Flexi Smart Growth Fund. हे फंड प्रामुख्याने NSE निफ्टी 100 इंडेक्स किंवा NSE निफ्टी 50 इंडेक्सचा भाग असलेल्या निवडक स्टॉक्समध्ये गुंतवणूक करतात.
– पॉलिसीधारक सुरुवातीला एक फंड निवडू शकतात आणि नंतर त्यांच्या गरजेनुसार स्विच करू शकतात.

News Title : LIC Index Plus Scheme

महत्त्वाच्या बातम्या –

‘मला तुरुंगात जायचं नाही असं…’; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

फोक्सवॅगन कंपनीची इलेक्ट्रिक कार धुमाकूळ घालणार? एका चार्जमध्ये धावणार तब्बल 600 किमी

“जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते”, भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

अश्विनचा ‘भारी’ सत्कार! 500 सोन्याची नाणी आणि 1 कोटी रुपये, भेटवस्तूंचाही वर्षाव

RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!