“काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची मशाल”, भाजपची बोचरी टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Ashish Shelar | इंडिया आघाडीच्या मुंबईतील सभेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाषण केले. इंडिया आघाडीतील दिग्गज नेते या सभेसाठी मुंबईत पोहोचले होते. ठाकरेंनी भाषण करताच सत्ताधारी भाजपने त्यांच्यावर सडकून टीका केली. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात नेहमीप्रमाणे जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशी न केल्यामुळे ते टीकाकारांच्या निशाण्यावर आले. मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी देखील याचाच दाखला देत ठाकरेंवर बोचरी टीका केली.

मुंबईतील सभेने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. रविवारी झालेल्या सभेला दिग्गजांची उपस्थिती होती. राहुल गांधी, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर, तेजस्वी यादव, एम के स्टॅलिन यांच्यासह इतरांनी उपस्थितांना संबोधित केले.

भाजपची सडकून टीका

उद्धव ठाकरेंच्या भाषणावर टीका करताना आशिष शेलार म्हणाले की, आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. उध्दव ठाकरे यांना न्याय सभेत फारच केविलवाणा ‘न्याय’ मिळाला? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो… अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का?

तसेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारकासमोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडेबोल ‘मर्दा’सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का? हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने ‘हिंदुत्वाला केले तडीपार’ हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच ‘शिवतीर्थावर’ सभा घेण्यात आली होती का? असा प्रश्न शेलारांनी विचारला.

 

Ashish Shelar यांची बोचरी टीका

याशिवाय सभा एक झाली… पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेले आहेत… काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची ‘मशाल’ आता खंजीर, वाघ, मर्द… कोथळा… अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल, अशा शब्दांत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. देशात सात टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत, तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात मतदार प्रक्रिया पार पडेल. संपूर्ण देशाचा निकाल हा 4 जूनला लागणार आहे.

News Title- Mumbai BJP president Ashish Shelar has criticized Uddhav Thackeray
महत्त्वाच्या बातम्या –

‘मला तुरुंगात जायचं नाही असं…’; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

फोक्सवॅगन कंपनीची इलेक्ट्रिक कार धुमाकूळ घालणार? एका चार्जमध्ये धावणार तब्बल 600 किमी

“जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते”, भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

अश्विनचा ‘भारी’ सत्कार! 500 सोन्याची नाणी आणि 1 कोटी रुपये, भेटवस्तूंचाही वर्षाव

RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!