‘मला तुरुंगात जायचं नाही असं…’; राहुल गांधींचा मोठा गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rahul Gandhi | सध्या भारत जोडो यात्रेची मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर सभा घेण्यात आली. भारत जोडो यात्रेची सांगता सभा पार पडली असून इंडिया आघाडीतील नेत्यांनी यासभेला संबोधित केलं. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, इतर काही नेत्यांनी सभेत मोदी सरकारवर हल्लाबोल केला. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी देखील राज्यातील काँग्रेस पक्ष सोडून गेलेल्या नेत्यावर भाष्य केलं आहे.

“वरिष्ठ नेत्यानं काँग्रेसमधून बाहेर पडत…”

राज्यामध्ये काँग्रेस नेत्यानं काही दिवसांआधी पक्षातून बाहेर पडत राजीनामा दिला. राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. “या राज्यामध्ये एका वरिष्ठ नेत्यानं काँग्रेसमधून बाहेर पडत माझ्या आईला रडत म्हणाला, सोनियाजी मला लाज वाटते सांगायला. माझ्यात लोकांसाठी लढण्याची हिंमत नाही. या शक्तीशी मला लढायचं नाही. मला तरूंगात जायचं नाही, असे एक नाही हजारो लोकं घाबरून गेले आहेत.” (Rahul Gandhi)

“शिवसेना, एनसीपीचे लोकं असेच गेले आहेत तुम्हाला काय वाटत? नाही. लोकांनी गळा पकडून भाजपकडे नेलं आहे. सर्व घाबरून गेले आहेत. चार हजार किमी चाललो, त्यानंतर सहा हजार किमी मणिपूर ते मुंबई, धारावीपर्यंत चाललो. यावेळी जे पाहिलं, ऐकलं ते मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही”, अशी भावना राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) व्यक्त केली.

“आम्ही भाजपविरोधात लढत आहोत. आम्ही एका राजकीय पक्षाविरोधात लढत आहोत असं लोकांना वाटतंय. देशाला ते वाटतंय पण ते सत्य नाही. आम्ही राजकीय पक्षाविरोधात लढत नाही, देशातील तरूणांनी हे लक्षात घ्यावं, आम्ही नरेंद्र मोदींवरोधात लढतोय”, असं राहुल गांधी म्हणाले.

ईव्हीएमवरून हल्ला

“एका व्यक्तीला चेहरा म्हणून बसवलं आहे. हिंदू धर्मामध्ये शक्ती हा शब्द असतो, आम्ही शक्तीच्या विरोधामध्ये लढत आहे. आता ती शक्ती काय? हा सवाल आहे”. त्यानंतर राहुल गांधींनी ईव्हीएम मशिनवरून हल्ला चढवला आहे.

“कुणी तरी म्हणालं आहे की राजाची आत्मी ही ईव्हीएम आहे. देशाच्या प्रत्येक संस्थेमध्ये असं आहे. म्हणजेच ईडी, सीबीआय, आयटीमध्ये सर्व संस्थांमध्ये आहे”, असं म्हणत राहुल गांधी यांनी मोदींवर हल्लाबोल केला आहे.

News Title – Rahul Gandhi Bharat Jodo Yatra Speech

महत्त्वाच्या बातम्या

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!

भाजपची मोठी खेळी; सोलापुरातून मोठी बातमी समोर