“अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या…”; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Vijay Shivtare | शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी बारामतीच्या उमेदवारीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर घणाघात केला आहे. त्यांनी अजित पवार यांना गंभीर इशारा दिला आहे. शिवतारे यांनी बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्याविरोधात स्वतःची उमेदवारी घोषित केली आहे.

यामुळे शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात तिढा निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर शिवतारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी मिडियाशी संवाद साधत मोठा दावा केला आहे. मागे अजित पवार यांनी शिवतारे यांच्यावर टीका केली होती. त्यालाही शिवतारे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

“ज्याच्या त्याच्या मरणाने तो मरेल, आपण…”

बारामतीमध्ये अजित पवार निवडून येणार नाहीयेत. मी जरी उमेदवार नसलो तरी अजित पवारांचा पराभव निश्चित आहे. मला मुख्यमंत्री म्हणाले आहेत की, बारामतीच्या निवडणुकीवरून आपण युतीधर्म पाळला पाहिजे, आपण युतीमध्ये आहोत. त्यांचं जे काही होईल ते आपसात होईल, त्यामध्ये आपण पडायला नको. ज्याच्या त्याच्या कर्माने तो मरेल, आपण त्यांच्या पराभवाचे धनी नको व्हायला, असं मुख्यमंत्री म्हणाले, असं शिवतारे  (Vijay Shivtare) यांनी सांगितलं आहे. त्यांच्या या विधानाची आता एकच चर्चा होत आहे.

शिवतारे यांचा अजित पवारांना इशारा

अजित पवार म्हणाले होते की विजय शिवतारे तुझा आवाका किती? तू करतोय काय? तुला बघतोच. आता अजित पवारांना माझा आवाका दाखवतोच. मी एवढा लहान आहे, माझी लायकी काय हे पण सांगतो, अशी टीका करणारे अजित पवार आता एवढं का घाबरत आहेत?, असा सवाल त्यांनी केलाय.

आता मी त्यांना माझी लायकी, माझा आवाका दाखवणारच, असा इशाराच विजय शिवतारे यांनी दिला आहे. पुढे ते म्हणाले की, मी एकनाथ शिंदे यांना कल्पना दिलीये. त्यांनी मला युतीधर्म पाळण्याचे संकेत दिलेत. जनतेची इच्छा आहे, ही अराजकता थांबवण्याची गरज आहे. ही लढाई पवार विरूद्ध जनता आहे, अशी टीकाही शिवतारे (Vijay Shivtare) यांनी केली आहे.

दरम्यान, येत्या दोन चार दिवसांमध्ये मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहे. आता पुण्याला गेल्यावर पुढची दिशा ठरवणार. बारामतीमध्ये अजित पवारांविरोधात खूप रोष आहे. त्यामुळे येथे त्यांचा विजय अशक्यच आहे, असा दावाच विजय शिवतारे यांनी केला आहे.

News Title-  Vijay Shivtare target ajit pawar  

महत्त्वाच्या बातम्या –

“माझी लायकी काय हे पण सांगतो…”, विजय शिवतारेंचा अजित पवारांना इशारा

वजन कमी करायचंय आणि डाएटही नको?, मग ही बातमी तुमच्यासाठीच

मोठी बातमी! हवामान विभागाकडून ‘या’ भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

मतदान यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही अशाप्रकारे तपासा!

प्रसिद्ध अभिनेत्रीचं पंतप्रधान मोदींबद्दल मोठं वक्तव्य; थेट म्हणाली..