मोठी बातमी! इम्तियाज जलील यांना ‘एमएआयएम’कडून उमेदवारी जाहीर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | ‘एमएआयएम’कडून छत्रपती संभाजीनगरचे (Chhatrapati Sambhaji Nagar) विद्यमान खासदार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना पुन्हा एकदा छत्रपती संभाजीनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. ‘एमएआयएम’चे प्रमुख असुदुद्दीन ओवैसी यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

‘एमएआयएम’कडून उमेदवार जाहीर

महाविकास आघाडीकडून ही जागा ठाकरे गटाला जाणार आहे. तर महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलील (Imtiyaz Jaleel) यांच्या विरोधात इतर दोन उमेदवार कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र तिरंगी लढत होणार असल्याचं बोललं जात आहे.

2019 च्या लोकसभा निवडणुकीत तत्कालीन औरंगाबाद मतदारसंघातून तिरंगी लढत झाली होती. त्यामुळे इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांचा विजय झाला होता.

इम्तियाज जलील पुन्हा निवडणुकीच्या मैदानात

या निवडणुकीत शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव हे अपक्ष म्हणून या निवडणुकीत मैदानात उतरले होते.

शिवसेनेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांना 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 3 लाख 84 हजार 550 मतं मिळाली. विद्यमान खासदार आणि एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील (Imtiyaz Jaleel) यांना सर्वाधिक 3 लाख 89 हजार 42 इतकी मतं लोकांनी दिली होती.

दरम्यान,  आगामी लोकसभा निवडणुका विदर्भातल्या पहिल्या टप्प्यात पाच मतदारसंघात 19 एप्रिलला आणि दुसऱ्या टप्प्यात उर्वरित पाच मतदारसंघात 26 एप्रिलला होणार आहे. रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या मतदारसंघात निवडणुकीची अधिसूचना 20 मार्चला निघणार असून 27 मार्चला अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“अजित पवार त्यांच्या कर्माने मरतील, आपण त्यांच्या…”; शिवसेना नेत्याच्या वक्तव्याने खळबळ

“माझी लायकी काय हे पण सांगतो…”, विजय शिवतारेंचा अजित पवारांना इशारा

वजन कमी करायचंय आणि डाएटही नको?, मग ही बातमी तुमच्यासाठीच

मोठी बातमी! हवामान विभागाकडून ‘या’ भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

मतदान यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही अशाप्रकारे तपासा!