‘अशा’ व्यक्तींमध्ये कधीच जीव अडकवू नका, नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत

Chanakya Niti | मानवी जीवनात भावना आणि नातेसंबंध अत्यंत महत्वाचे असतात. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी नाते असतात जी त्याला अत्यंत प्रिय असतात. हीच नाते व्यक्तीचे जीवन आनंदी बनवते. आचार्य चाणक्य यांनीही याबाबत सांगितलं आहे.

जीवनात मैत्री ही खूप खास असते. मैत्री मनुष्याला परिपूर्ण बनवते. आपल्या मित्राचा-मैत्रिणींचा जीवनावर खूप परिणाम होत असतो. त्यामुळे मैत्री करताना विचार करूनच करावी. कारण, संगतीचा खूप परिणाम होत असतो. त्यामुळे मैत्री करताना एकदा विचार करूनच त्याबाबत निर्णय घ्यावा.

कधीकधी चुकीच्या मित्रांमुळे एखाद्या व्यक्तीला जीवनात यश मिळविण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे व्यक्तीने जीवनात कोणत्या लोकांना साथ देऊ नये, याबाबत या लेखात सांगितलं आहे. आचार्य चाणक्य यांनी यासाठी काही तत्त्वे सांगितली आहेत. त्याचा अवलंब केला तर, जीवनात कोणत्याही अडचणीमधून तुम्ही सहज बाहेर पडू शकता.

अहंकारी व्यक्ती

चाणक्य यांनी सांगितलं आहे की, माणसाने अशा लोकांपासून दूर राहावे जे खूप अहंकारी असतात. जर तुम्ही गर्विष्ठ लोकांसोबत राहाल तर तुमची वागणूकही बदलेल आणि तुम्ही अहंकारी होऊ लागाल.

स्वार्थी व्यक्ती

चाणक्याने आपल्या निती शास्त्रात लिहिलं आहे की, व्यक्तीने कधीही स्वार्थी लोकांशी मैत्री करू नये. याशिवाय कोणत्याही स्वार्थी लोकांचे समर्थन करू नये. चाणक्याच्या मते, स्वार्थी लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान देखील करतात. त्यामुळे अशा लोकांपासून दूर राहणेच तुमच्या हिताचे आहे.

खोटी प्रशंसा करणारे लोक

चाणक्य यांनी म्हटलं आहे की, सर्वांची खोटी प्रशंसा करणाऱ्या लोकांपासून नेहमी दूर राहावे. अशा लोकांना जर तुम्ही पाठिंबा दिला तर तुमचेच नुकसान होईल. जे लोक इतरांची खोटी प्रशंसा करतात ते खूप चतुर असतात. असे लोक स्वतःच्या फायद्यासाठी इतरांचे नुकसान देखील करू शकतात.

स्वतःचा फायदा शोधणारे

चाणक्याने म्हटलं आहे की, व्यक्तीने अशा लोकांपासून दूर राहिले पाहिजे जे केवळ स्वत:च्या फायद्याचा विचार करतात. खरं तर, हे लोक तुमच्याशी फक्त त्यांच्या कामासाठी मैत्री करतात. त्यामुळे अशा परिस्थितीत या लोकांपासून अंतर राखणंच हिताचं आहे.

भांडण, वाद करणारे लोक

अशा लोकांपासून दूर राहावं जे सतत भांडत राहतात. असे लोक कोणाला समोर बोलू देत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना पाठिंबा देऊन तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही. त्यामुळे अशा व्यक्तीसोबत जास्त काळ राहू नये.

News Title :  Chanakya niti for friendship
 महत्वाच्या बातम्या- 

“जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते”, भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

अश्विनचा ‘भारी’ सत्कार! 500 सोन्याची नाणी आणि 1 कोटी रुपये, भेटवस्तूंचाही वर्षाव

RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!

“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर