Suhana Khan | बाॅलिवूडचा बादशाह शाहरुख खानच्या फॅन फॉलोइंग प्रमाणेच त्याची मुलगी अभिनेत्री सुहाना खानची सुद्धा जबरदस्त फॅन फॉलोइंग आहे. सुहानाने ‘द अर्चेिज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. अनंत आंबानीच्या प्री वेडिंग शूटमध्येही सुहाना झळकली होती. सोशल मीडियावर सुहाना कायम सक्रिय असते. आपल्या चाहत्यांसाठी ती कायम नवनवीन फोटोज शेअर करत असते. मात्र, सुहानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी संताप व्यक्त केला आहे.
काय आहे प्रकार?
अभिनेत्री सुहाना खान (Suhana Khan) आपल्या चाहत्यांसाठी रोज नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करते. दरम्यान, तिने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला ज्याची सगळीकडे एकच चर्च सुरु आहे. या व्हिडीओमध्ये सुहाना बाथटबमध्ये बसून वेगवेगळे पोज देताना दिसत आहे. सुहानाचे फोटो आणि व्हिडीओ पाहिल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सुहानाच्या पोस्टवर चाहते लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत.
View this post on Instagram
पोस्टवर कमेंटस-
सुहानाच्या (Suhana Khan) व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नेटकऱ्यांनी आणि चाहत्यांनी भरपूर लाईक्स दिले. तर काहींनी तिला ट्रोल करत तिच्या टिका केली आहे. कमेंटसमध्ये तिच्या व्हि़डीओमधील हाॅट आणि बाॅल्ड लूकचं कौतूक केलं आहे. तर काहींनी मात्र सुहानावर निशाणा साधला आहे. एक नेटकरी म्हणाला, ‘रमजान आहे थोडी तरी लाज बाळग..’, विरोध करत दुसरा नेटकरी म्हणाला, ‘तुझ्याकडून ही अपेक्षा कधीच नव्हती…’ सध्या सर्वत्र सुहानाच्या पोस्टची चर्चा रंगली आहे.
जेव्हापासून सुहानाने सिनेसृष्टित पदार्पण केलंय तेव्हापासून सोशल मीडियावर तिच्याबद्दल कायम चर्चा सुरू असतात. अगदी सुहाना काय कपडे घालते काय करते इथपासून ते ती कधी आणि कोणासोबत दिसते, यावरही चाहते बारीक लक्ष ठेवून असतात.
News Title : suhana khan video gets viral
महत्त्वाच्या बातम्या-
रशियात पुन्हा पुतिनराज!; विजयानंतर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, भारताची चिंता वाढली
“प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते..”, सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ
…भर स्टेडिअमवर स्मृतीच्या बॉयफ्रेंडने मारली घट्ट मिठी; फोटो तुफान व्हायरल
पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
सरकारच्या या योजनेद्वारे नागरिकांना मिळणार मोफत वीज! असा करा अर्ज