‘आमचा निर्णय झालाय’; काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा

Sangli Lok sabha | लोकसभा निवडणुकीची तारीख आता समोर आली आहे. तरीही महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून वाद होताना दिसत आहे. काही मतदारसंघामध्ये काँग्रेस आणि शिवसेना दावा करताना दिसत आहेत. यामुळे काही मतदारसंघावरून काँग्रेस आणि शिवसेना आता हमरा तुमरीवर आले आहेत.

पश्चिम महाराष्ट्रातील एका जागेवरून शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जुंपली आहे. उगाच हट्ट करू नका आमचा निर्णय झालाय असं म्हणत शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जागावाटपावरून तिढा सुटणं अवघड होऊन बसलं आहे. सांगलीच्या लोकसभा (Sangli Lok sabha) जागेवर काँग्रेस आणि शिवसेनेनं दावा केला आहे. यामुळे दोन्ही पक्षामध्ये वाद सुरू आहे.

काय म्हणाले विश्वजीत कदम?

“देशाच्या स्वातंत्र्यापासून सांगली जिल्हा आणि सांगली मतदारसंघात (Sangli Lok sabha) काँग्रेस होती. सांगली काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. महाराष्ट्राला देशाला दूरदृष्टी कौतुकापद नेतृत्व सांगलीच्या भूमीने महाराष्ट्राला काँग्रेसच्या विचारातून दिलं आहे. म्हणून या काँग्रेसच्या विचारधारेवर विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या जिल्ह्यामध्ये हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाकडे राहिला पाहिजे,” असं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.  (Sangli Lok sabha)

“महाविकास आघाडी आता एकत्र आली आहे. देशातील जातीयवादी शक्तींना मिटवायचं आहे. आता महाविकास आघाडी निवडणूक लढतेय याचा मला आनंद आहे. सांगलीच्या जागेवर घटक पक्षाने दावा सांगण्याची आवश्यकता नाही. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहणार आहे, अशी विनंती महाराष्ट्रातील काँग्रेस श्रेष्ठींकडे केली होती, ही जागा काँग्रेसकडे राहणार आहे. यावर ठाम असल्याचं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.

चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीवर भाष्य

“चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत. पैलवान म्हणून प्रसिद्ध आहेत. मात्र राजकारण आणि सामाजकारण करत असताना विचारधारेचं पाठबळ लागतं. सांगलीमध्ये दुष्काळाचा प्रश्न आहे. त्याबाबत अनेकदा प्रश्न उपस्थित केले जातात. चंद्रहार पाटील यांनी सहा ते सात दिवस ठाकरे गटामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या उमेदवारीची चर्चा आहे”, असं विश्वजीत कदम म्हणाले आहेत.

सांगली लोकसभेची जागा शिवसेनेनं मागणं अत्यंत चुकीचं आहे. लोकनियुक्तीने ठाकरे गटाचे सांगलीतील 10 तरी ग्रामपंचायतीच्या जागा आहेत का? 10 तरी सरपंच आहे का? असा प्रश्न त्यांनी केला.

News Title – Sangli Lok sabha Election Shivsena Uddhav Thackeray Vs Congress

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी! हवामान विभागाकडून ‘या’ भागांना यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी

मतदान यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही अशाप्रकारे तपासा!

प्रसिद्ध अभिनेत्रीचं पंतप्रधान मोदींबद्दल मोठं वक्तव्य; थेट म्हणाली..

शाहरुख खानच्या मुलीचा ‘तो’ व्हिडीओ तूफान व्हायरल; सगळीकडे एकच खळबळ

“काही चुकलं असेल तर माफ करा…”; अभिनेता कुशल बद्रिकेची भावूक पोस्ट चर्चेत