“आमच्याकडे ईडी, सीबीआयसह सत्ता आली तर…”; राऊतांचा भाजपला इशारा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sanjay Raut | आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखा आता समोर आल्या आहेत. यापार्श्वभूमीवर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला गंभीर इशारा दिला आहे. आमच्याकडे ईडी, सीबीआयसह सत्ता आली तर देवेंद्र फडणवीस तुमच्या पक्षाला तुम्ही वाचवून दाखवा, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी फडणवीस आणि भाजपला इशारा दिला आहे. फडणवीस यांनी परिवार वादावरून केलेल्या वक्तव्यावरून राऊतांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

“लोहा लोहे को काटता है”

लोहे लोहे को काटता है तुम्हालाच माहिती आहे असं नाही, हे आम्हालाही कळतं, अशा कडक शब्दात संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारी पार्टी

यावेळी बोलत असताना संजय राऊत यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे. “भारतीय जनता पार्टी ही भ्रष्टाचारी पार्टी आहे. भ्रष्टाचाराला समर्थन देणारी पार्टी आहे. भ्रष्टाचारासाठी काम करणारी पार्टी आहे, ही भाजपची ओळख आहे. त्यांनी फक्त आरशामध्ये बघितलं तर केवळ भ्रष्टाचार दिसणार,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष”

“भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवणारा पक्ष आहे. त्यांच्याकडे स्वत:ची पोरं नाहीत. यांनी सर्व आमची फोडलेली पोरं घेतली आहेत. भाजपने स्वत:च्या पोरांचे पाळणे हलवावेत, दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हलवू नयेत, नाहीतर दे पुन्हा पळून जातील”, असं टीकास्त्र संजय राऊत यांनी डागलं आहे.

संजय राऊत हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपावरूनही बोलले आहेत. “जागावाटप संपलेली आहे. नेहरू सेंटरमध्ये आम्ही जमलेलो. त्यावेळी रामटेकची जागा ही रामटेकला निश्चित झाली. कोल्हापूरच्या बदल्यात सांगली शिवसेनेकडे राहिल. कोल्हापूर ही आमची सिटींग जागा आहे. चंद्रहार पाटील हे आमचे उमेदवार घोषित केले गेले आहेत.”

“प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत सध्या काँग्रेस चर्चा करत आहे. ते कालच्या सभेला (भारत जोडो सांगता सभा) आले होते ही सकारात्मक बाब आहे”, असं राऊत म्हणाले आहेत.

News Title – Sanjay Raut On BJP And Devendra Fadanvis

महत्त्वाच्या बातम्या

रशियात पुन्हा पुतिनराज!; विजयानंतर पुतिन यांचं मोठं वक्तव्य, भारताची चिंता वाढली

“प्रत्येक नात्याची एक्स्पायरी डेट असते..”, सख्ख्या भावाने सोडली अजित पवारांची साथ

…भर स्टेडिअमवर स्मृतीच्या बॉयफ्रेंडने मारली घट्ट मिठी; फोटो तुफान व्हायरल

पंतप्रधानपदाबाबत नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

सरकारच्या या योजनेद्वारे नागरिकांना मिळणार मोफत वीज! असा करा अर्ज