महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर!

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) दिल्लीला रवाना झाले आहेत. महाराष्ट्रातील भाजपचे दिग्गज नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना झाले आहेत. राज ठाकरे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीत सहभागी होण्याबाबत चर्चा करण्यासाठी दिल्लीला रवाना झाल्याचं कळतंय.

राज ठाकरे दिल्लीला रवाना

राज ठाकरे आज दुसऱ्यांदा दिल्लीच्या दौऱ्याला निघाले आहेत. दिल्लीत आज अतिशय महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे सुद्धा दिल्लीत असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या चार दिवसांमधील राज ठाकरे यांची ही दुसरी दिल्लीवारी आहे. राज ठाकरे यांच्या या दिल्ली दौऱ्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आलाय.

महायुतीच्या जागावाटपात मनसेची एन्ट्री

सातत्याने राज ठाकरे आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी होत आहेत. त्यामुळे राज ठाकरे महायुतीत सहभागी होणार असल्याच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. अशात राज ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यामुळे

राज ठाकरे यांच्या पक्षासाठी महायुतीकडून दक्षिण मुंबईची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. या ठिकाणी मनसे नेते बाळा नांदगावकर यांना मनसेकडून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे.

लोकसभा जागावाटपाची बोलणी सुरु असताना राज ठाकरे यांच्या दिल्लीवारीला महत्त्व प्राप्त झालं आहे. त्यामुळे आता दिल्लीत काय घडणार?, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या- 

मैदानातच स्मृती मंधानाला आला विराट कोहलीचा व्हिडीओ कॉल!

“जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपला कुत्र विचारत नव्हतं…”, नाथाभाऊ कडाडले

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली महत्त्वाची घोषणा

“मर्दा सारखं… ”, भाजपची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

‘अशा’ व्यक्तींमध्ये कधीच जीव अडकवू नका, नाहीतर मोजावी लागेल मोठी किंमत