“मर्दा सारखं… ”, भाजपची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर झाली. यावेळी सभेला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर दिग्गजांची उपस्थिती होती.

याच सभेमध्ये उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. मात्र, यावेळी भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, मातांनो आणि भगिनींनो अशी सुरुवात केली नाही. यावरूनच भाजपने त्यांच्यावर चांगलीच टीका केली आहे. आशिष शेलार यांनी पोस्ट करत उद्धव ठाकरेंना टार्गेट केलं आहे.

आशिष शेलार यांची टीका

आपल्याच तोऱ्यात आपली सभा घेऊन… आपल्याला हवे तेवढे… शिवतीर्थावर भाषण करणारे.. श्रीमान उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना न्याय सभेत फारच केविलवाणा “न्याय” मिळाला? भाषणासाठी पाच मिनिटे ठरवून दिली गेली का? भाषणाची सुरुवात “जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो…!” अशी करण्यास बंदी घालण्यात आली होती का? स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्मारका समोर झालेल्या सभेत सावरकरांचा अपमान करणाऱ्यांना दोन खडे बोल “मर्दा” सारखे ऐकवण्यास कोणी मज्जाव केला होता का?

हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या सुपुत्राने “हिंदुत्वाला केले तडीपार” हे तमाम महाराष्ट्राला दाखवून देण्यासाठीच “शिवतीर्थावर” सभा घेण्यात आली होती का? सभा एक झाली.. पण प्रश्न अनेक निर्माण करुन गेली.. काँग्रेसच्या हातात बाहुल्यासारखी दिली उबाठा गटाची “मशाल” आता खंजीर, वाघ, मर्द..कोथळा.. अशा काहीही फुशारक्या मारा खुशाल!, अशी पोस्ट करत आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.

उद्धव ठाकरे काय म्हणाले?

मी नेहमी सांगतो माझा देश हाच माझा धर्म आहे आणि आपला हा देश वाचला तर आपण वाचू. आपला देश हीच आपली किंवा एखाद्या व्यक्तीची ओळख असली पाहिजे. एका व्यक्तीवरून देशाची ओळख होता कामा नये. कोणी कितीही मोठा असला तरी माझा देश त्याच्यापेक्षा मोठा आहे. आपण म्हणतो हा माझा देश आहे, या देशाच्या सरकारला भारत सरकार म्हणतो. परंतु, ते लोक ‘मोदी सरकार, मोदी सरकार अशी जाहिरात करताय.

तुमच्या डोक्यात माझ्या देशाचं नाव बदलण्याचं स्वप्न आहे का? भारत हे माझ्या देशाचं नाव आहे आणि आम्ही ते कोणालाही बदलू देणार नाही. शिवतीर्थावरून मुंबईतून जेव्हा रणशिंग फुंकलं जातं, तेव्हा संपूर्ण देश त्या वाटेवरून चालू लागतो. गांधीजींनी मुंबईतून इंग्रजांना ‘चले जाव’ सांगितलं होतं, आता लोकशाही मारण्यासाठी टपलेल्या हुकूमशाहीला तडीपार करण्यासाठी ‘शिवाजी पार्क’ निवडलेलं आहे. उद्याच्या निवडणुकीनंतर आपल्या देशभक्तीचं पीक ह्या गद्दारांना दिसलं पाहिजे, असं उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले होते.

News Title :  Ashish Shelar on Uddhav Thackeray

महत्वाच्या बातम्या- 

RCB अखेर चॅम्पियन! विजेत्या संघावर कोट्यवधींचा वर्षाव; 13 पुरस्कारांचे वाटप, वाचा सविस्तर

“मोदींनी त्यांच्या पत्नीसोबत…”, प्रकाश आंबेडकरांचा मोदींना सल्ला

‘अब की बार भाजप तडीपार, हुकूमशाहीचा अंत करा’; उद्धव ठाकरेंचा भाजपवर हल्लाबोल

मोठी बातमी! शिंदे गटाच्या आमदाराच्या गाडीवर हल्ला

बाळासाहेब ठाकरेंना राहुल गांधींकडून पहिल्यांदाच अभिवादन!