“जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपला कुत्र विचारत नव्हतं…”, नाथाभाऊ कडाडले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Eknath Khadse | आगामी लोकसभा आता जवळ आली आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा देखील जाहीर झाल्या आहेत. भाजपची दुसरी यादी बाहेर आली आहे. दुसऱ्या यादीमध्ये 20 उमेदवारांचं नाव आहे. यामध्ये आता जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्या सून रक्षा खडसे यांना भाजपकडून उमेदवारी देण्यात आली आहे. यामुळे आता रक्षा खडसे यांच्याविरोधामध्ये एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांची मुलगी रोहिणी खडसे किंवा स्वत: एकनाथ खडसे (Eknath Khadse) निवडणूक लढवतील असं वाटत होतं. यावर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

रावेर मतदारसंघातून रक्षा खडसे यांना उमेदवारी दिली असली तरीही रावेर मतदारसंघामध्ये तुतारीचा आवाज घुमणार आहे. शेवटपर्यंत तुतारीच कशी विजयी होईल यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यानंतर एकनाथ खडसे यांनी नाव न घेता गिरीश महाजन यांच्यावर हल्ला चढवला आहे.

काय म्हणाले एकनाथ खडसे?

“जळगाव जिल्ह्यामध्ये भाजपला कुत्र विचारत नव्हतं. तेव्हा मी एकटा लढलो, असा टोला एकनाथ खडसे यांनी नाव न घेता लगावला आहे. मी संघर्ष करताना कधी खचलो नाही. कधी पळालो नाही, कधी विकलो नाही. सत्तेसाठी या ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलो नाही.” असं वक्तव्य राष्ट्रवादी आमदार एकनाथ खडसे यांनी केलं आहे.

“रावेर मतदरासंघामध्ये तुतारी वाजणार”

“छळ झाला…सगळं झालं पण मी ठाम राहिलो, मी आणि माझा पक्ष आहे तुम्हाला काय करायचं आहे ते करा, अशी आपली भूमिका आहे. मी माझ्या मर्जीचा मालक आहे कोणी सांगायची गरज नाही. रक्षा खडसे यांना जरी उमेदवारी दिली तरीही रावेर मतदरासंघामध्ये तुतारी वाजणार”, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी भाजपवर हल्ला केला.

“शेवटच्या क्षाणापर्यंत तुतारी कशी विजयी होईल हे पाहणार आहे, यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत, असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे. रावेर मतदारसंघातून उमेदवारीस नकार दिल्याने होत असलेल्या आरोपांवर एकनाथ खडसे यांनी उत्तर दिलं आहे.”

रोहिणी खडसेंच्या विधानसभा निवडणुकीवर स्पष्टीकरण

“रोहिणी खडसे या विधानसभेसाठी उभ्या राहणार आहेत. त्यामुळे त्यांचा लोकसभा निवडणुकीसाठी कोणताही सहभाग नाही, असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी दिलं आहे. समोर कोणीही असो मी घाबरणारा माणूस नाही. आजपर्यंत मी घाबरलेलो नाही, निवडून आलेलो आहे”, असं एकनाथ खडसे म्हणाले आहेत.

News Title – Eknath Khadse On BJP And Raksha Khdase

महत्त्वाच्या बातम्या

फोक्सवॅगन कंपनीची इलेक्ट्रिक कार धुमाकूळ घालणार? एका चार्जमध्ये धावणार तब्बल 600 किमी

“जमलेल्या माझ्या हिंदू बांधवांनो म्हणायलाही लाज वाटते”, भाजप आणि ठाकरे गटात जुंपली

अश्विनचा ‘भारी’ सत्कार! 500 सोन्याची नाणी आणि 1 कोटी रुपये, भेटवस्तूंचाही वर्षाव

RCB चॅम्पियन होताच ‘विराट’ सेलिब्रेशन; किंग कोहलीही थिरकला, स्मृतीचं ‘मानधन’ वाढलं!

“महाराष्ट्रातील एक वरिष्ठ नेता भाजपमध्ये गेला पण माझ्या आईसमोर…”, राहुल गांधींनी उडवली खिल्ली