सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना दिलासा, चिन्हाबाबत मोठी अपडेट समोर

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NCP Symbol | पक्ष आणि चिन्ह हे आपलंच असल्याचा दावा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांनी केला आहे. निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला चिन्ह आणि पक्ष (NCP Symbol) दिला आहे. यामुळे शरद पवार गटाने निवडणूक आयोग आणि अजित पवार यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. याविरोधात शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली असून याबाबत मोठी अपडेट आता समोर आली आहे. (NCP Symbol)

शरद पवार गटाला दिलासा

शरद पवार गटाला लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी तुतारी हे चिन्ह असणार आहे. मात्र त्यानंतर कोणत्याही उमेदवाराला तुतारी चिन्ह दिलं जाऊ नये अशी सुनावणी सुप्रीम कोर्टाने केली आहे. यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला दिलासा मिळाला असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या सुनावणीमध्ये अजित पवार गटाला सुप्रीम कोर्टाने चांगलंच झापलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनरवर शरद पवार यांच्या फोटोचा वापर केला आहे. शरद पवार यांना सोडून अजित पवार यांनी पक्ष मिळवला. त्यानंतर शरद पवार यांना बाजूला सारत बॅनरवर शरद पवार यांचे फोटो का लावले जात आहेत. शरद पवार मोठ्या उंचीचे नेते आहेत. आधी स्वत:ची ओळख प्रस्थापित करा, असं म्हणत सुप्रीम कोर्टाने अजित पवार गटाला फटकारले.

पक्ष आणि चिन्ह वापरण्याची मुभा

राज्यसभेची काही दिवसांआधी निवडणूक पार पडली आहे. निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने तुतारी हे चिन्ह दिलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हे नाव दिलं आहे. हे नाव आणि चिन्ह फक्त राज्यसभा निवडणुकीपर्यंत होतं. मात्र आता हे नाव आणि चिन्ह लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीला वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. (NC Symbol)

काही महिन्यांआधी शरद पवार आणि अजित पवार गटाने पक्ष आणि चिन्हावर (NCP Symbol) दावा केला, तेव्हा अजित पवार यांच्या बाजूने निवडणूक आयोगाने निकाल दिला. हा निकाल आमदारांच्या संख्याबळावर दिला. अजित पवार गटाचे आमदार हे अधिक होते. आणि शरद पवार गटाचे आमदार कमी होते, यामुळे पक्ष आणि चिन्ह हे अजित पवार यांना देण्यात आलं.

मात्र आता सुप्रीम कोर्टाने शरद पवार यांना तुतारी चिन्ह दिलं असून आगामी लोकसभा आणि विधानसभेला तुतारी चिन्हाचा शरद पवार यांना वापर करता येणार आहे, असं सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली आहे.

News Title – NCP Party Symbol Announcement Supreme Court

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरेंना शरद पवार गटाची खुली ऑफर!

आमलकी एकादशीचा दिवस ‘या’ 3 राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार!

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीच्या दाव्याने खळबळ

“तू सगळ्यात मोठा दरिद्री आहेस…”; किरण मानेंची पोस्ट व्हायरल

‘घरफोड्या देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकलं पाहिजे’; ठाकरे कडाडले