horoscope prediction | दैनिक राशिफल हे ग्रह-नक्षत्राच्या हालचालीवर आधारित एक भविष्यवाणी असते. ज्यामध्ये मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ आणि मीन या राशींचे वर्णन केलेले असते.
वैदिक दिनदर्शिकेनुसार वर्षात एकूण 24 एकादशी व्रत केले जातात. एकादशीचा दिवस भगवान विष्णूला अतिशय प्रिय आहे. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात एकूण 2 एकादशी असतात. एक कृष्ण पक्ष आणि दुसरा शुक्ल पक्ष. ज्योतिषांच्या मते फाल्गुन महिन्यात येणाऱ्या एकादशीला आमलकी एकादशी म्हणतात.
पौराणिक कथेनुसार आमलकी एकादशीचे व्रत केल्यास भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान विष्णू यांचा आशीर्वाद प्राप्त होतो. या महिन्यात हे व्रत 20 मार्च रोजी पाळण्यात येणार आहे. या दिवशी 50 वर्षांनंतर पुष्य नक्षत्रात रवियोग तयार होणार आहे. असे मानले जाते की पुष्य नक्षत्रात जेव्हा रवि योग तयार होतो तेव्हा तो खूप शुभ असतो. या शुभ योगाचा 3 राशींवर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. आता या तीन राशी कोणत्या याबाबत या लेखात सविस्तर माहिती सांगितली आहे.
मेष राशी :
मेष राशीच्या लोकांसाठी आमलकी एकादशीचा दिवस वरदानापेक्षा कमी नाही. कारण या दिवशी तुम्हाला अचानक धन लाभ होऊ शकतो. अनावश्यक खर्चावरही नियंत्रण (Horoscope prediction) ठेवता येईल. नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते. उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी :
आमलकी एकादशीचा वृषभ राशीच्या लोकांवर सकारात्मक प्रभाव पडेल. ज्यांना शिक्षण आणि व्यवसायाच्या क्षेत्रात करियर बनवायचे आहे त्यांना भगवान शिव, माता पार्वती आणि भगवान शिव यांचा आशीर्वाद असेल. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला यश प्राप्ती होईल.
तूळ राशी :
तूळ राशीच्या लोकांसाठी 20 मार्चचा ( horoscope prediction) दिवस अत्यंत शुभ असणार आहे. घरात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. संबंध सुधारू इच्छिणाऱ्यांसाठी हा काळ चांगला राहील. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. आरोग्यही चांगले राहील. तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल.
News Title – horoscope prediction
महत्वाच्या बातम्या-
रोहितऐवजी हार्दिकला का कर्णधार बनवलं? प्रश्न ऐकताच कोचची झाली बोलती बंद!
कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा
“मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, राहुल गांधींचं…”, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ
महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?