PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

PSL Final | पाकिस्तान सुपर लीगच्या यंदाच्या हंगामाचा किताब इस्लामाबाद युनायटेडने जिंकला. शादाब खानच्या नेतृत्वातील या संघाने मोहम्मद रिझवानच्या मुल्तान सुल्तानचा पराभव केला. दोन गडी राखून विजय मिळवत इस्लामाबादने तिसऱ्यांदा पाकिस्तान सुपर लीग जिंकण्याची किमया साधली. अंतिम सामन्यात इस्लामाबाद युनायटेडसाठी इमाद वसीमची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली, ज्यात त्याने गोलंदाजीत 5 बळी घेत संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आणि निर्णायक वेळी 19 धावांची नाबाद खेळी केली.

प्रथम फलंदाजी करताना मुल्तान सुल्तान संघाला 20 षटकात केवळ 159 धावांपर्यंत मजल मारता आली. यानंतर लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इस्लामाबाद युनायटेड संघाने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून ट्रॉफी जिंकण्यात यश मिळविले. मुल्तानने दिलेल्या 160 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इस्लामाबादने 20 षटकांत 8 बाद 163 धावा करून विजय मिळवला. संघाकडून मार्टिन गुप्टीलने सर्वाधिक 50 धावा केल्या.

PSL मध्ये बक्षिसांचा दुष्काळ

अंतिम सामन्यात मुल्तान सुल्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यासिर शाह आणि डेव्हिड विलीच्या रूपाने संघाने 14 धावांपर्यंत 2 गडी गमावले होते. मुल्तान सुल्तानचा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि उस्मान खानने डाव नक्कीच सांभाळला पण त्यांच्या संथ फलंदाजीमुळे संघाचे नुकसान देखील झाले.

उस्मानने 40 चेंडूत 57 धावा केल्या तर कर्णधार रिझवानने 26 चेंडूंचा सामना करत केवळ 26 धावाच केल्या, ज्यात 3 चौकारांचा समावेश होता. मात्र, शेवटच्या काही षटकांमध्ये इफ्तिखार अहमदच्या 20 चेंडूत 32 धावांच्या खेळीमुळे संघाला 159 धावांपर्यंत मजल मारता आली.

 

PSL Final इस्लामाबादचा विजय

जगातील सर्वात लोकप्रिय ट्वेंटी-20 लीग अर्थात आयपीएलच्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीग खूप मागे आहे. शेजारील देशातील माजी खेळाडू अनेकदा पीएसएलची तुलना आयपीएलशी करत असतात. रविवारी झालेल्या महिला प्रीमिअर लीगच्या अंतिम सामन्यानंतर खेळाडूंना बक्षिसांचे वाटप करण्यात आले.

खरं तर आयपीएलमधील विजेत्या संघाला 20 कोटी रूपये दिले जातात, तर उपविजेत्या संघाला 13 कोटी मिळतात. महिला प्रीमिअर लीगमधील विजेत्या संघाला 6 कोटी आणि उपविजेत्या संघाला 3 कोटी मिळतात. पण, पाकिस्तान सुपर लीगमधील विजेत्या संघाला अवघे 4.15 कोटी रूपये दिले जातात, तर उपविजेत्या संघाला 1.6 कोटी रूपयांवर समाधान मानावे लागते.

News Title- Islamabad United beat Multan Sultan to win trophy in PSL Final 2024, see prize money and everything here
महत्त्वाच्या बातम्या –

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?

‘आमचा निर्णय झालाय’; काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा

“भावाच्या विरोधात सख्ख्या भावाला उभं करणं हा एक अत्यंत…”

महायुतीत मनसेची एंट्री?; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ‘त्या’ वक्तव्याने राजकारणात खळबळ

“आमच्याकडे ईडी, सीबीआयसह सत्ता आली तर…”; राऊतांचा भाजपला इशारा