Rohit Pawar | आगामी लोकसभा निवडणुकीमुळे सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. महाराष्ट्रात सध्या सर्वच पक्षांमध्ये जागावाटपाचा तिढा निर्माण झाला आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येत आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे थेट दिल्लीला पोहोचले आहेत. त्यामुळे लवकरच मनसेही महायुतीमध्ये सामील होणार, अशा जोरदार चर्चा रंगत आहेत.
राज ठाकरेंनी दिल्लीमध्ये अमित शाह यांची भेट घेतली आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंना थेट शरद पवार गटाने खुली ऑफर दिली आहे. शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी राज ठाकरेंना ही ऑफर दिली आहे. त्यामुळे राज्यात सध्या राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आला आहे.
रोहित पवारांची राज ठाकरेंना ऑफर
ईडी आणि विविध संस्थांना घाबरून एखादा नेता त्यांची भूमिका बदलत असेल तर हे बरोबर नाही. आज लोकांना लढणारे नेते पाहिजेत. महाराष्ट्राच्या हितासाठी सामान्य लोकांच्या वतीने महाशक्तीच्या विरोधात जो लढेल तो लोकांच्या मनात बसणार आहे. आज लढायची परिस्थिती असताना भाजपबरोबर न जाता आपण एकत्र येऊन लढलं पाहिजे, असं रोहित पवार म्हणालेत.
2019 मध्ये राज ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता. असंच पुन्हा एकत्र येऊन भाजपविरोधात लढलो तर राज ठाकरेंबद्दलची आपुलकी वाढेल. ते धाडसी आणि लढणारे नेते आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यायला हवं, असं आवाहन रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केलं आहे.
यावेळी रोहित पवार यांनी मोठा खुलासाही केला. अजित पवार गटातील एका मंत्र्याने एक-दीड महिन्यांपूर्वीच राजीनामा दिला आहे. त्यांच्या गटातील अनेक आमदार भाजपत जाणार आणि उरलेले आमच्याकडे येणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
राज ठाकरे महायुतीत सामील होणार?
दरम्यान, लोकसभेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक सुरु आहे. या बैठकीत राज ठाकरे हे एका विशेष चार्टर्ड विमानाने दिल्लीला गेले असून येथे ते महायुती संदर्भात चर्चा करण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये पोहोचताच पहिली प्रतिक्रिया दिली. राज ठाकरे यांनी दिल्लीत गेल्यावर सूचक वक्तव्य केलं आहे. “आत्ता माझ्याकडे बोलण्यासारखं काही नाही. मला काहीही माहीत नाही. मला फक्त दिल्लीत या असं सांगितलं त्यामुळे मी आलोय.”, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे. त्यामुळे राजकारणात सध्या राज ठाकरेंच्या दिल्ली वारीची आणि रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या ऑफरची चर्चा होत आहे.
News Title – Rohit Pawar Offer To Raj Thackeray To Join Mahavikas Aghadi
महत्वाच्या बातम्या-
“देशानं दशकभर अच्छे दिनची वाट पाहिली पण…”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का?, माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर?
रोहित शर्मा आयपीएल खेळणार का?; मुंबई इंडियन्सने दिली मोठी अपडेट
रोहितऐवजी हार्दिकला का कर्णधार बनवलं? प्रश्न ऐकताच कोचची झाली बोलती बंद!
कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा