“सुशांत सिंहसोबत जे घडलं तेच माझ्यासोबत घडलं”, अभिनेत्याचा गंभीर आरोप

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Sushant Singh Rajput | मनोरंजनसृष्टीत झगमगाट पाहायला मिळतो. त्यांचे राहनीमान, त्यांच्या जीवनशैलीबद्दल आपल्याला आकर्षण वाटते. पण मनोरंजनसृष्टीमध्ये पडद्याच्या आड घडणाऱ्या गोष्टी ऐकल्या तर मनोरंजनसृष्टीसारखे वाईट क्षेत्र कोणतंच नाही. काही वर्षांआधी अभिनेता सुशांत सिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याने आत्महत्या (Sushant Singh Rajput) केली. त्यावर आता अभिनेता रणवीर शौरीने याबाबत वक्तव्य केलं आहे. माझ्याबाबतीतही सुशांत सिंह (Sushant Singh Rajput) सारख्या घटना घडल्या असल्याचा धक्कादायक दावा त्याने केला आहे.

काय म्हणाला रणवीर शौरी?

रणवीर शौरीने निर्माता आणि दिग्दर्शक महेश भट्ट यांच्यावर गंभीर आरोप केला. महेश भट्ट यांच्याबद्दल मला आदर होता पण आता तो आदर राहिला नाही, असा गंभीर आरोप रणवीर शौरी याने केला आहे. सुशांत सिंह राजपूतसोबत (Sushant Singh Rajput) जे घडलं तसंच काहीसं माझ्याबाबतीत घडल्याचा धक्कादायक दावा अभिनेत्याने केला.

रणवीर शौरीने ‘या’ चित्रपटांमध्ये केलं काम

ऑफ दे रेकॉर्ड प्रत्येकजण या गोष्टीला स्विकारेल असं रणवीर म्हणाला आहे. रणवीरने आतापर्यंत खोसला का घोसला, एक था टायगर, टायगर 3, कडवी हवा, भेजा फ्रायसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. एकेकाळी महेश भट्ट यांची मुलगी पूजा भट्टला अनेकदा डेट करत होता, याबाबत त्याने माहिती सांगितली.

नुकत्याच एका मुलाखतीमध्ये रणवीर शौरी याने एक धक्कादायक खुलासा केला आहे. “माझ्या मनामध्ये महेश भट्टविषयी खूप आदर होता. तिचा वापर करून ते माझी फसवणूक करत होते,” असा धक्कादायक खुलासा रणवीरने केला आहे. “मात्र जोपर्यंत सुशांत सिंहबद्दल काही झालं नव्हतं तोपर्यत मी पूजा भट्टला डेट करत होतो. माझ्या मनात त्यांच्याबद्दलचा आदर होता, त्याचाच उपयोग करत त्यांनी माझी अनेकदा फसवणूक करण्याचा प्रयत्न केला”, असं रणवीर शौरीने सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ranvir Shorey (@ranvirshorey)

“सुशांत सिंहच्या मृत्यूनंतर वर्क कल्चर आणि गटबाजीवर चर्चा होऊ लागली होती. हा वादाचा मुद्दा नव्हता हे फक्त फिल्म इंडस्ट्रीमध्ये नव्याने होऊ लागलं होतं. एखाद्याविरोधात गँग बनवणं, एखाद्याला बाजूला काढणं, दुसऱ्याची मदत घेऊन त्याच्यावर वार करणं यासर्व गोष्टी इंडस्ट्रीमध्ये घडताना दिसतात. हे सर्व राजकारणात, कार्पोरेट आणि मीडियामध्येही घडताना दिसतं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये ग्लॅमरकडे लोकांचं लक्ष वेधलं जात आहे.”

“सुशांत सिंहसोबत मी एकत्र काम केलं होतं. सोनचिडिया चित्रपटामध्ये दोघांनी काम केलं होतं. मी असं म्हणणार नाही की आम्ही एकमेकांचे जवळचे नव्हतो पण आम्ही मित्र होतो, असं रणवीर शौरी म्हणाला. तो अनेकदा माझ्या घरी आला होता. चित्रपटाच्या चित्रिकरणावेळी आम्ही दोघांना ओळखू लागलो होतो,” असं रणवीर शौरी म्हणाला.

News Title – Sushant Singh Rajput On Ranveer Shorey Statement

महत्त्वाच्या बातम्या

अगदी काही मिनिटांत घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता! अशाप्रकारे करा अर्ज

इंजिनियर्स तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु

EV सेगमेंटमध्ये लाँच होणार ही जबरदस्त कार! या तगड्या कारशी स्पर्धा करणार

यंदाचा IPL हंगाम असणार खास; या दिग्गज व्यक्तीची होणार एंट्री

“भाजपने स्वत:ची चड्डी सोडून काँग्रेसचं लंगोट बांधलंय”