अगदी काही मिनिटांत घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता! अशाप्रकारे करा अर्ज

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

How To Apply Driving Licence l जर तुम्ही वाहन मालक असाल तर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स असणे अत्यंत आवश्यक आहे. कारण वाहन चालवताना तुमच्याकडे लायसन्स नसेल आणि पोलिसांनी पकडले तर मोठा दंड भरावा लागतो. त्यामुळे गाडी चालवताना महत्त्वाची कागदपत्रे सोबत ठेवल्यास दंडाच्या टेन्शनपासून सुटका मिळते. तर आज आपण ड्रायव्हिंग लायसन्ससाठी ऑनलाईन स्वरूपात अर्ज कसा करतात हे जाणून घेऊयात.

How To Apply Driving Licence Documents l या कागदपत्रांची आवश्यकता :

– पासपोर्ट आकाराचा फोटो,
– स्वाक्षरी, लर्निंग लायसन्स क्रमांक आणि मोबाईल क्रमांक
– आधार कार्ड
– रहिवासी प्रमाणपत्र
– राहत्या पत्त्याचा पुरावा (रेशन कार्ड, पॅन कार्ड, वीज बिल),
– जन्मतारीख प्रमाणपत्र (दहावीची गुणपत्रिका, जन्म प्रमाणपत्र, ओळखपत्र देऊ शकता)

How To Apply Driving Licence l अशाप्रकारे करा अर्ज :

स्टेप 1- सर्वप्रथम तुम्हाला sarathi.parivahan.gov.in वर जावे लागेल.

स्टेप 2- त्यानंतर तुमचे राज्य निवडा.

स्टेप 3- आता “नवीन ड्रायव्हिंग लायसन्स” वर क्लिक करा. हा पर्याय “ड्रायव्हिंग लायसन्स” मेनूमध्ये दिसेल.

स्टेप 4- आता तुम्हाला लर्निंग लायसन्स क्रमांक आणि DOB (जन्मतारीख) भरावे लागेल.

स्टेप 5- आता अर्ज भरावा लागेल.

स्टेप 6- पुढे जाण्यासाठी पुढील बटणावर टॅप करा.

स्टेप 7- आता तुम्हाला मूळ कागदपत्रे आणि फी स्लिपसह नियोजित वेळी आरटीओमध्ये जावे लागेल.

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी टेस्ट आवश्यक :

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी MV कायद्यानुसार ड्रायव्हिंग टेस्ट देणे खूप महत्वाचे आहे. तुमचे वय 18 वर्षांपेक्षा जास्त झाल्यानंतरच तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करू शकता. राजधानी दिल्लीत पोस्ट ऑफिसमधून ड्रायव्हिंग लायसन्स घरपोच पाठवले जाते. तर अनेक राज्यांमध्ये तुम्ही ते आरटीओकडून मिळवू शकता.

News Title- How To Apply Driving Licence

महत्त्वाच्या बातम्या –

इंजिनियर्स तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु

EV सेगमेंटमध्ये लाँच होणार ही जबरदस्त कार! या तगड्या कारशी स्पर्धा करणार

यंदाचा IPL हंगाम असणार खास; या दिग्गज व्यक्तीची होणार एंट्री

“भाजपने स्वत:ची चड्डी सोडून काँग्रेसचं लंगोट बांधलंय”

LIVE सामन्यात बांगलादेशचे 4 खेळाडू गंभीर जखमी! एकजण रुग्णालयात दाखल