LIVE सामन्यात बांगलादेशचे 4 खेळाडू गंभीर जखमी! एकजण रुग्णालयात दाखल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bangladesh | बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका पार पडली. सोमवारी या मालिकेतील अखेरचा सामना खेळवला गेला. बांगलादेशने हा सामना जिंकून मालिका आपल्या नावावर केली. (Bangladesh vs Sri Lanka) त्यांनी 2-1 असा विजय मिळवला. (BAN vs ODI Series) पण, बांगलादेशच्या खेळाडूंची दुखापत थांबताना दिसत नाही. कालही याचा प्रत्यय आला अन् चार खेळाडू गंभीर जखमी झाले. बांगलादेशचे एकामागून एक चार खेळाडू जखमी झाले. त्यापैकी दोघांना स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले.

श्रीलंकेविरुद्धच्या 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशचे 4 खेळाडू गंभीर जखमी झाले. अवघ्या 3 षटकांत चारपैकी दोन खेळाडू जखमी झाले. त्यांना एवढी दुखापत झाली की खेळाडूंना स्ट्रेचरवर मैदानाबाहेर न्यावे लागले. खरं तर वेदनांमुळे त्यांना चालता देखील येत नव्हते.

एकजण रुग्णालयात दाखल

वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान आणि जेकर अली गंभीर जखमी झाले. यापैकी यष्टिरक्षक जाकर अलीची प्रकृती अधिक गंभीर असल्याचे दिसल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. खरं तर श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यादरम्यान, वेगवान गोलंदाज मुस्तफिजुरचा हात लचकला आणि त्याला स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले.

तर अनकॅप्ड यष्टीरक्षक फलंदाज जाकेर अली मैदानावर झालेल्या धडकेत जखमी झाला. झेल पकडण्याच्या प्रयत्नात त्याची आणि सहकारी खेळाडू अनामूल हकशी टक्कर झाली. त्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. अनामूल हकही जखमी झाला मात्र त्याची दुखापत किरकोळ होती.

Bangladesh ने मालिका जिंकली

48 व्या षटकात मुस्तफिजुर रहमान जखमी झाला. तर जाकेर अली 50 व्या षटकात जखमी झाला. म्हणजेच हे दोन्ही खेळाडू अवघ्या 3 षटकांत जखमी झाले. जाकेर अलीला मुस्तफिजूरप्रमाणेच स्ट्रेचरवर मैदानाबाहेर नेण्यात आले नाही, तर त्याच्या दुखापतीचे गांभीर्य लक्षात घेऊन त्याला रुग्णालयातही नेण्यात आले.

स्टार फलंदाज सौम्या सरकार हा क्षेत्ररक्षणादरम्यान चेंडू अडवताना मैदानात लावलेल्या जाहिरात फलकावर जाऊन पडला. त्यामुळे त्याच्या मानेला काहीशी दुखापत झाली. सामन्याबद्दल भाष्य करायचे झाले तर, श्रीलंकेने बांगलादेशविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 235 धावा केल्या. बांगलादेशकडून तस्किन अहमदने 3 बळी घेतले, तो सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. बांगलादेशने एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकून विजयी सलामी दिली, तर दुसरा सामना जिंकून श्रीलंकेने मालिकेत बरोबरी साधली. मात्र अखेरचा सामना जिंकून बांगलादेशने 2-1 ने मालिका जिंकली.

News Title- BAN vs SL 3rd ODI Four Bangladesh players were injured during the third match against Sri Lanka
महत्त्वाच्या बातम्या –

नागरिकांनो बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; अन्यथा अडचणींना सामना करावा लागेल

“देशानं दशकभर अच्छे दिनची वाट पाहिली पण…”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का?, माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर?

रोहित शर्मा आयपीएल खेळणार का?; मुंबई इंडियन्सने दिली मोठी अपडेट

रोहितऐवजी हार्दिकला का कर्णधार बनवलं? प्रश्न ऐकताच कोचची झाली बोलती बंद!