Rohit Sharma | आयपीएलचा सतरावा हंगाम सुरू होण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. या स्पर्धेतील पहिला सामना 22 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. रांची येथे सलामीचा सामना खेळवला जाईल. (hardik pandya press conference) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचे सर्व वेळापत्रक अद्याप जाहीर झाले नाही. पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. आयपीएलचा आगामी हंगाम विविध कारणांनी महत्त्वाचा असणार आहे. मुंबई इंडियन्स प्रथमच हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात मैदानात असणार आहे.
रोहित शर्माला कर्णधारपदावरून काढल्याने मुंबईच्या चाहत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मुंबईच्या फ्रँचायझीने हार्दिकच्या कर्णधारपदाची घोषणा करताच एकच खळबळ माजली. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचा किताब जिंकला आहे. मुंबईने गुजरात टायटन्सकडून ट्रेड झाल्यानंतर आलेल्या हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले.
हार्दिक आणि मार्क यांची फजिती
आयपीएल सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या आणि संघाचे मुख्य प्रशिक्षक मार्क बाउचर यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी एका पत्रकाराने बाउचर यांना विचारले की, असे काय कारण होते, ज्यामुळे संघ व्यवस्थापनाने रोहित शर्मा संघाचा कर्णधार नसेल हा धाडसी निर्णय घेतला.
पत्रकाराचा प्रश्न ऐकताच मुंबईचे प्रशिक्षक बाउचर आणि कर्णधार हार्दिक पांड्या देखील स्तब्ध झाला. कठीण प्रश्नावर व्यक्त होताना दोघांचीही बोलती बंद झाल्याचे दिसले. बाउचर यांनी माईकही उचलला पण या प्रश्नाचे ते उत्तर देऊ शकले नाहीत. याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Why Rohit Sharma isn’t leading Mumbai Indians? Forget Mark Boucher, even Hardik Pandya looks clueless pic.twitter.com/Wah3pk3VzG
— EngiNerd. (@mainbhiengineer) March 18, 2024
Rohit Sharma मुंबईचा माजी कर्णधार
खरं तर कर्णधारपद मिळण्याची हमी मिळाल्यानंतरच हार्दिक पांड्या गुजरातमधून मुंबईत आल्याचा दावा अनेकांनी केला. असा प्रश्नही हार्दिकला विचारण्यात आला पण त्याच्याकडेही उत्तर नव्हते. हार्दिकच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सने मागील दोन हंगामात चमकदार कामगिरी केली. दोन्ही हंगामात संघाने अंतिम फेरी गाठली तर एकदा जेतेपद पटकावले.
रोहित शर्मा आयपीएल 2024 साठी मुंबई इंडियन्सच्या संघात सामील झाला आहे. रोहित सोमवारी सरावासाठी वानखेडे स्टेडियमवर पोहोचला. 2013 मध्ये मुंबईने रोहित शर्माला कर्णधार बनवले. 11 हंगामात त्याने 5 वेळा संघाला किताब जिंकून दिला. रोहित शर्माला कर्णधार व्हायचे होते, असे बोलले जात आहे. पण तरीही व्यवस्थापनाने त्याला हटवून हार्दिककडे ही जबाबदारी दिली.
News Title- Hardik Pandya and Mark Boucher were asked why Rohit Sharma was removed from the captaincy of Mumbai Indians
महत्त्वाच्या बातम्या –
कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा
“मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, राहुल गांधींचं…”, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर
PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ