कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा

Kangana Ranaut | सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. अद्याप काही जागांवर उमेदवारांची चाचपणी सुरू आहे. जिथे तगडा उमेदवार नसतो तिथे अनेकदा राजकीय पक्ष अभिनेता, अभिनेत्रींना तिकीट देत असतात. हीच परंपरा आगामी काळात देखील दिसण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यापासून हालचालींना वेग आला आहे. अभिनेत्री कंगना रनौतला भाजप हिमाचलमधून तिकीट देऊ शकते. तिला हिमाचलच्या मंडी मतदारसंघातून तिकीट दिले जाऊ शकते.

कंगनानेही निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मंडीतून तिकीटाच्या प्रबळ दावेदारांमध्ये तिची गणना केली जात आहे. हिमाचल प्रदेशातील चारपैकी दोन जागांवर भाजपने उमेदवार उभे केले आहेत. कांगडा आणि मंडी या दोन जागा शिल्लक आहेत. माहितीनुसार, मंडी मतदारसंघातून भाजप ज्या नावांचा विचार करत आहे त्यात कंगना रनौतचेही नाव आहे.

कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री?

भाजपने आतापर्यंत दोन याद्या जाहीर केल्या असून 267 उमेदवारांची नावं उघड केली आहेत. तिसरी यादीही लवकरच येऊ शकते. त्यासाठीची तारीख 20 किंवा 21 मार्च असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये कंगना रनौतचेही नाव असू शकते. भाजपच्या तिसऱ्या यादीत कंगनाचे नाव असणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अलीकडेच कंगनाने म्हटले होते की, मी भाजपची प्रवक्ता नाही… मला लोकसभेचे तिकीट मिळणार का याबद्दल मी कशी काय सांगू शकते. आणि असे काही घडले तर पक्ष आपापल्या परीने आणि योग्य वेळी आणि योग्य ठिकाणी सर्वकाही जाहीर करेल. कंगनाचे हे सूचक विधान चर्चेत आहे.

Kangana Ranaut लोकसभा लढण्याची शक्यता

कंगना ही मूळची मंडी जिल्ह्यातील आहे. ती राजपूत समाजातून येते. मंडईत राजपूत समाजातील मतदारांची संख्या चांगली आहे. मंडीमध्ये अनुसूचित जातीचे मतदारही बऱ्यापैकी आहेत, जे भाजपचे समर्थक मानले जातात. मतांच्या या समीकरणाचा भाजपला फायदा होऊ शकतो.

दरम्यान, हिमाचलमधील लोकसभेच्या चार जागांवर 1 जून रोजी मतदान होणार आहे. यासोबतच विधानसभेच्या सहा जागांसाठी 1 जून रोजी पोटनिवडणूकही होणार आहे. काँग्रेसचे सहा आमदार अपात्र ठरल्यानंतर या जागा रिक्त झाल्या आहेत.

News Title- Bollywood Actress Kangana Ranaut likely to contest Lok Sabha elections from BJP
महत्त्वाच्या बातम्या –

“मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, राहुल गांधींचं…”, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?

‘आमचा निर्णय झालाय’; काँग्रेसचा ठाकरे गटाला इशारा

“भावाच्या विरोधात सख्ख्या भावाला उभं करणं हा एक अत्यंत…”