मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का?, माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर?

Priya Dutt | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची सांगता मुंबईत शिवतीर्थावर म्हणजेच शिवाजी पार्क मैदानावर झाली. यावेळी सभेला इंडिया आघाडीचे प्रमुख नेते शरद पवार, राहुल गांधी, प्रियांका गांधी, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यासह इतर दिग्गजांची उपस्थिती होती.

एकीकडे काँग्रेस शक्तीप्रदर्शन करत असताना मुंबईतच पक्षाला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे दिवंगत खासदार आणि अभिनेते सुनील दत्त यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांची मुलगी प्रिया दत्तला लोकसभा निवडणुकीचे तिकिट देऊन खासदार केलं होतं.

माजी खासदार प्रिया दत्त शिवसेनेच्या वाटेवर?

मात्र, आता प्रिय दत्त काँग्रेस सोडण्याच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा आहे. प्रिया दत्त एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं म्हटलं जातंय. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का बसणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा काँग्रेससाठी  मोठा धक्का मानला जाईल.

अगोदरच पक्षातील दिग्गज नेत्यांनी साथ सोडली आहे. मुरली देवरा, बाबा सिद्दीकी, अशोक चव्हाण यांनी कॉँग्रेसला रामराम ठोकला आहे. मुरली देवरा शिवसेनेत, बाबा सिद्दीकी राष्ट्रवादीत तर अशोक चव्हाण भाजपात गेले आहेत. आता प्रिया दत्तही (Priya Dutt ) शिवसेनेमध्ये जाण्याची शक्यता आहे.

प्रिया दत्त शिंदे गटात जाणार?

प्रिया दत्त (Priya Dutt) सर्वप्रथम 2009 मध्ये उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या होत्या. मात्र, 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांना भाजपच्या पूनम महाजन यांनी हरवलं होतं. मोदी लाटेत प्रिया दत्त यांचा पराभव झाला.

सध्या त्या काँग्रेस पक्षात अधिक सक्रिय नाहीत. एका एनजीओच्या माध्यमातून त्या समाजसेवा करत आहेत. त्यांनी काँग्रेस सोडण्यावर आणि शिवसेनेत जाण्याच्या चर्चांवर अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. मात्र, प्रिया दत्त लवकरच शिंदे गटात प्रवेश करु शकतात अशी चर्चा राजकारणामध्ये होऊ लागली आहे.

News Title- Former Congress MP Priya Dutt is likely to join the Shinde group

महत्त्वाच्या बातम्या –

रोहितऐवजी हार्दिकला का कर्णधार बनवलं? प्रश्न ऐकताच कोचची झाली बोलती बंद!

कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा

“मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, राहुल गांधींचं…”, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?