“देशानं दशकभर अच्छे दिनची वाट पाहिली पण…”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Aditya Thackeray | काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईत झाला. दादर येथील ऐतिहासिक अशा शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा पार पडली. या सभेसाठी देशभरातील दिग्गज नेते उपस्थित होते. महाराष्ट्रातील शरद पवार, प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी तेजस्वी यादव, एम के स्टॅलिन यांच्यासह इतरही राजकीय मंडळी उपस्थित होती.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले असताना इंडिया आघाडीने देखील मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. राज्यात काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्रित लढणार आहे. प्रकाश आंबेडकरांची वंचित बहुजन आघाडी मविआचा भाग असली तरी अद्याप जागावाटप झाले नाही.

मोदी सरकारवर टीकास्त्र

दरम्यान, मुंबईतील इंडिया आघाडीच्या सभेचा दाखला देत ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले. त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत सरकारला धारेवर धरले. ते म्हणाले की, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये भारत जोडो यात्रेच्या समारोपासह INDIA आघाडीने निवडणूक प्रचाराचा नारळ फोडला. हे ठिकाण ऐतिहासिक आणि नावाजलेलं आहेच, पण त्याहूनही महत्वाचं म्हणजे, हे स्थळ अखंड प्रेरणा आणि उर्जेचा धगधगता स्रोत आहे. सध्या आपला देश हुकूमशाही राजवटीमुळे संकटकाळात सापडला आहे.

तसेच धमक्या, भ्रष्टाचार आणि चुकीच्या माहितीच्या सहाय्याने ही राजवट फोफावली आहे. ही राजवट म्हणजे देशाचा कारभार कसा चालवला जाऊ नये, ह्याचा वस्तूपाठच आहे! बेरोजगारी, महागाई, अस्थिरता, धार्मिक फूट आणि हेतुपुरस्सर द्वेष पसरवून ही राजवट राज्य करू पाहते आहे. पण हे आता चालणार नाही. आम्ही इथे फक्त अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी नाही तर ही हुकूमशाही राजवट उलथवून टाकण्यासाठी एकत्र आलो आहोत, असेही आदित्य ठाकरे यांनी नमूद केले.

 

Aditya Thackeray कडाडले

ते पुढे म्हणाले की, आपल्या लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी आणि दिलेलं प्रत्येक आश्वासन पूर्ण करण्यासाठी INDIA आघाडी कटीबद्ध आहे, कारण ह्या देशातली सारी जनताच आमची ताकद आहे. देशाने दशकभर अच्छे दिनची वाट पाहिली, पण देशाला प्रगतीपथावर नेण्यापेक्षा ह्या राजवटीने देशाला कित्येक दशकं मागे नेलं… पण आता हीच वेळ आहे राष्ट्राने एकत्र येण्याची, साऱ्या जनतेने INDIA आघाडीसोबत ठाम उभं राहण्याची आणि देशाला उज्वल भविष्याकडे घेऊन जाण्याची आहे.

दरम्यान, मागील आठवड्यात निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीच्या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यात निवडणुका होणार आहेत. तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर 4 जून रोजी देशभरात लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल.

News Title- Aditya Thackeray criticized the ruling BJP led by Narendra Modi
महत्त्वाच्या बातम्या –

रोहित शर्मा आयपीएल खेळणार का?; मुंबई इंडियन्सने दिली मोठी अपडेट

रोहितऐवजी हार्दिकला का कर्णधार बनवलं? प्रश्न ऐकताच कोचची झाली बोलती बंद!

कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा

“मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, राहुल गांधींचं…”, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ