नागरिकांनो बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; अन्यथा अडचणींना सामना करावा लागेल

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Bank Holidays in March 2024 l अगदी काही दिवसांवर होळीचा सण येऊन ठेपला आहे. यंदाच्या वर्षी 25 मार्च 2024 रोजी देशभरात होळी साजरी केली जाणार आहे. होळीच्या या शुभमुहूर्तावर देशातील अनेक शहरातील सर्व सरकारी बँकांसह खासगी बँकाही बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी बँक संदर्भात काही महत्वाची कामे असतील तर लवकरात लवकर उरकून घ्यावीत अन्यथा तुमचे काम लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. काही शहरांमध्ये 25 मार्च 2024 रोजीही बँका सुरू राहतील.

Bank Holidays in March 2024 l देशातील अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार! :

मार्च 2024 मध्ये बँका एकूण 14 दिवस बंद राहणार असल्याची माहिती RBI ने दिली होती. यामध्ये रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार, सार्वजनिक आणि प्रादेशिक सुट्ट्यांचा समावेश आहे. तुम्हालाही काही कामासाठी बँकेत जावे लागत असेल, तर तुम्ही तुमच्या शहरातील बँक हॉलिडे लिस्ट एकदा तपासून पहा.

25 मार्च 2024 रोजी होळीचा सण आहे. यानिमित्त देशातील अनेक शहरांमध्ये बँका बंद राहणार आहेत. यासोबतच 23 मार्च 2024 (चौथा शनिवार), 24 मार्च 2024 (रविवार) रोजीही बँका बंद राहणार आहेत. याचा अर्थ अनेक शहरांमध्ये बँका मंगळवारी 26 मार्च 2024 उघडतील.

Bank Holidays in March 2024 l 25 मार्च रोजी बँका कुठे बंद राहणार? :

होळी 2024 निमित्त आगरतळा, अहमदाबाद, ऐझॉल, बेलापूर, भोपाळ, चंदीगड, डेहराडून, गंगटोक, गुवाहाटी, हैदराबाद, इटानगर, जयपूर, जम्मू, कानपूर, कोलकाता, लखनौ, मुंबई, नागपूर, नवी दिल्ली, पणजी, रायपूर, रांची, शिलाँग आणि शिमला येथील सर्व बँका बंद राहणार आहेत.

ऑनलाइन सेवा सुरू राहणार! :

बँका बंद राहिल्या तरी ग्राहकांना ऑनलाईन बँकिंग सेवांचा लाभ मिळणार आहे. याचा अर्थ असा की बँकेच्या सुट्टीच्या दिवशी ग्राहकांना ऑनलाइन बँकिंग, नेट बँकिंग, एटीएम इत्यादी सेवा सहज मिळू शकतात. याशिवाय युजर्स क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे ऑनलाइन पेमेंट करू शकतात.

News Title- Bank Holidays in March 2024

महत्त्वाच्या बातम्या –

“देशानं दशकभर अच्छे दिनची वाट पाहिली पण…”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का?, माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर?

रोहित शर्मा आयपीएल खेळणार का?; मुंबई इंडियन्सने दिली मोठी अपडेट

रोहितऐवजी हार्दिकला का कर्णधार बनवलं? प्रश्न ऐकताच कोचची झाली बोलती बंद!

कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा