“भाजपने स्वत:ची चड्डी सोडून काँग्रेसचं लंगोट बांधलंय”

Sanjay Raut | काल परवा मुंबईच्या दादर येथील शिवाजीपार्कच्या मैदानावर इंडिया आघाडीच्या नेत्यांनी आपली उपस्थिती दर्शवली. शिवाजी पार्कच्या मैदानावर काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेची सांगता सभा पार पडली होती. यासभेमध्ये इंडिया आघाडीचे अनेक नेते आले होते. त्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शिवसेनेवर हल्ला केला. त्यानंतर आता ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर पलटवार केला आहे.

भाजपने स्वत:ची चड्डी सोडून काँग्रेसचं लंगोट बांधलं असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे. तसेच बाळासाहेबांनी इंदिराजींचं स्वागत केलं होतं. तेव्हा चंद्रशेखर बावनकुळे यांचा जन्मदेखील झाला नव्हता, असं म्हणत संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजप आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर टीका केली आहे. राऊतांनी (Sanjay Raut) सामना या वृत्तपत्राच्या अग्रलेखातून भाजपवर निशाणा साधला आहे.

सामना अग्रलेख जसाच्या तसा

राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मणिपुरातून सुरू झाली ती मुंबईत पोहोचली. मुंबईने राहुल गांधींचे स्वागत केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही तेव्हा इंदिरा गांधी यांचे स्वागतच केले होते, पण तेव्हा भाजप व बावनकुळ्यांचा जन्म व्हायचा होता, असं म्हणत राऊतांनी बावनकुळेंना सुनावलं आहे.

राहुल गांधी यांनी देशातले वातावरण नक्कीच जिवंत केले आहे. मुंबईत त्यांनी बहर आणली. इंडिया आघाडीने मुंबईत युद्धाचा शंख फुंकला. भाजपने काँग्रेसचाच लंगोट बांधला असल्याने शंख फुंकताच त्यांचा लंगोट सुटला. त्याचे आता काय करायचे? दिवा विझता विझता मोठा होतो तसे भाजपचे झाले आहे. भाजपने स्वतःच्या काँग्रेसी लंगोटाची काळजी घ्यावी. नसत्या उठाठेवी करू नयेत, असा टोलाही भाजपला लगावलाय.

भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील धारावीत झाला. त्या निमित्ताने राहुल गांधींचे मुंबईत मोठे शक्ती प्रदर्शन झाले. त्या शक्ती प्रदर्शनाने भाजप व त्यांच्या गुलाम गटांची बुबुळे बाहेर आली. रविवारी शिवतीर्थावर ‘इंडिया’ आघाडीची विराट सभाही पार पडल्याने लोकसभा प्रचाराचे रणशिंग मुंबईतच फुंकले गेले. सभेत देशभरातील प्रमुख नेते उपस्थित राहिले. देशातील परिवर्तनाची सुरुवात महाराष्ट्रातून व खासकरून मुंबईतून झाली हे महत्त्वाचे. मुंबईतून 1942 साली ब्रिटिशांना ‘चले जाव’चा इशारा दिला होता. 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबईतील गवालिया टँक मैदानात लाखांच्या संख्येने जनसमुदाय जमला होता व स्वातंत्र्यापूर्वीच्या शेवटच्या सर्वात मोठय़ा लढय़ाची म्हणजे ‘चले जाव’ची घोषणा तेथे झाली.

रविवारी शिवतीर्थावरून साधारण त्याच प्रकारची गर्जना झाली. ब्रिटिश राजवटीपेक्षाही भयंकर हुकूमशाही देशातील मोदी राजवटीत सुरू आहे व त्यांना ‘चले जाव’चा इशारा देणारी सभा मुंबईत पार पडली. याच सभेत ‘अबकी बार, भाजप तडीपार’ अशी बुलंद हाक देण्यात आली. ‘इंडिया’ आघाडीच्या नेत्यांनी या वेळी जोरदार भाषणे केली. जनतेतही या सभेने ऊर्जेचा संचार झाला. त्याचा परिणाम असा झाला की, मोदी म्हणतात, या वेळी 370 जिंकू, पण अमित शहांनी आता सांगितले 300 जिंकू. म्हणजे मुंबईतील एका सभेनेच हुकूमशहांच्या 70 जागा कमी केल्या. जसजसे ‘इंडिया’चे वादळ घोंघावत जाईल तसे तसे भाजपचे आकडे घसरत जातील, असं राऊतांनी म्हटलंय.

“भाजपने स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट बांधले”

श्री. राहुल गांधी म्हणजेच काँग्रेससोबत शिवतीर्थावर झालेल्या सभेच्या’न्याय मंचा’वर उद्धव ठाकरे उपस्थित राहिले म्हणून भाजप व त्यांच्या गुलाम गटांत पोटाचे विकार सुरू झाले. ठाकरे यांना काँग्रेसबरोबर मंचावर जाणे वगैरे शोभते काय? अशी बकवास त्यांनी केली. ज्या भाजपने स्वतःची चड्डी सोडून काँग्रेसचे लंगोट बांधले आहे त्यांनी शिवसेना काँग्रेसच्या मंचावर गेली याबद्दल दुःख व्यक्त करावे हे आक्रित आहे. मुळात भाजपने स्वतःची ‘काँग्रेस’ करून घेतली आहे, असं राऊत म्हणालेत.

News Title – Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule Via Samana News Paper

महत्त्वाच्या बातम्या

रोहितऐवजी हार्दिकला का कर्णधार बनवलं? प्रश्न ऐकताच कोचची झाली बोलती बंद!

कंगनाची अखेर राजकारणात एन्ट्री? भाजपच्या तिकिटावरून लढू शकते लोकसभा

“मी कधीच सोनिया गांधींसमोर रडलो नाही, राहुल गांधींचं…”, अशोक चव्हाणांचे प्रत्युत्तर

PSL Final: इस्लामाबाद चॅम्पियन! IPL, WPL च्या तुलनेत पाकिस्तान सुपर लीगमध्ये बक्षिसांचा दुष्काळ

महाविकास आघाडीत ठाकरे गटाला ‘इतक्या’ जागा मिळणार?