यंदाचा IPL हंगाम असणार खास; या दिग्गज व्यक्तीची होणार एंट्री

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Navjot Singh Sidhu Returns To Commentary l 22 मार्चपासून IPL 2024 चा हंगाम सुरु होत आहे. अशातच स्टार स्पोर्ट्सने चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. नवज्योत सिंग सिद्धू इंडियन प्रीमियर लीगमध्ये समालोचन करताना दिसणार आहे. सिद्धूबद्दल माहिती देताना स्टार स्पोर्ट्सने लिहिले की, महान नवज्योत सिंग सिद्धू आमच्या स्टारकास्टमध्ये सामील झाला आहे. 22 मार्चपासून आयपीएल-2024 सुरू होत आहे.

Navjot Singh Sidhu Returns To Commentary l नवज्योत सिंग सिद्धू लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता! :

मात्र अशातच काँग्रेस नेते आणि माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू आगामी लोकसभा निवडणुकीपासून दूर राहण्याची शक्यता आहे. नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्नीच्या प्रकृतीमुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. पतियाळा येथून नवज्योतसिंग सिद्धू यांना उमेदवारी देण्याची काँग्रेसची तयारी होती, परंतु नवज्योतसिंग सिद्धू यांनी पत्नी कर्करोगाने त्रस्त असल्याने लोकसभा निवडणूक लढविण्यास नकार दिला आहे.

दरम्यान, सिद्धू यांचा पंजाब काँग्रेसच्या नेतृत्वाशी वाद सुरू असल्याचीही बातमी समोर आली आहे. ते पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही चर्चा होती. अफवांवर, सिद्धूच्या टीमने सांगितले की ते काँग्रेस आणि राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.

2004 मध्ये राजकारणात केला प्रवेश :

सिद्धू हे पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष राहिले आहेत. पंजाब सरकारमध्ये ते मंत्रीही राहिले आहेत. काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी सिद्धू भाजपमध्ये होते. 2004 मध्ये त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. ते अमृतसरमधून खासदार म्हणून निवडून आले. 2014 पर्यंत ते या जागेवरून खासदार राहिले. 2016 मध्ये भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवले. मात्र नंतर त्यांनी पक्ष सोडला. 2017 मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि काँग्रेसच्या तिकिटावर अमृतसर पूर्वमधून निवडणूक जिंकली. पण 2022 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

राजकारणात येण्यापूर्वी सिद्धू क्रिकेटमध्ये होते. तो टीम इंडियाचा सलामीवीर राहिला आहे. त्याने 51 कसोटी सामने आणि 136 एकदिवसीय सामने खेळले. क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, त्याने समालोचनात प्रवेश केला आणि तो त्याच्या वन-लाइनरसाठी ओळखला जाऊ लागला. कॉमेडी नाइट्स विथ कपिल आणि द कपिल शर्मा शोमध्येही तो दिसला होता.

News Title- Navjot Singh Sidhu Returns To Commentary

महत्त्वाच्या बातम्या –

नागरिकांनो बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; अन्यथा अडचणींना सामना करावा लागेल

“देशानं दशकभर अच्छे दिनची वाट पाहिली पण…”, आदित्य ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल

मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का?, माजी खासदार शिवसेनेच्या वाटेवर?

रोहित शर्मा आयपीएल खेळणार का?; मुंबई इंडियन्सने दिली मोठी अपडेट

रोहितऐवजी हार्दिकला का कर्णधार बनवलं? प्रश्न ऐकताच कोचची झाली बोलती बंद!