इंजिनियर्स तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NHPC Ltd Engineer Recruitment 2024 l सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडने (NHPC) प्रशिक्षणार्थी अधिकारी आणि प्रशिक्षणार्थी अभियंता या रिक्त पदांसाठी भरती राबवली आहे. या भरती अंतर्गत 269 पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी पात्र असलेले सर्व उमेदवार ऑनलाइन स्वरूपात अर्ज करू करू शकतात. इच्छुक उमेदवार NHPC nhpcindia.com च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. सर्वात महत्वाचं म्हणजे इकचुक उमेदवार 26 मार्च 2024 पर्यंत अर्ज करू शकतात.

NHPC Ltd Engineer Recruitment 2024 l पात्रता आणि निकष काय आहेत? :

या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी GATE 2023 स्कोअर कार्डसह संबंधित प्रवाहात अभियांत्रिकी पदवी / PG / BE / B.Tech / MSc / M.Tech इ. असणे आवश्यक आहे. यासोबतच उमेदवाराचे कमाल वय 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. आरक्षित प्रवर्गातून येणाऱ्या उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सवलत दिली जाईल. 26 मार्च 2024 रोजी वयाची गणना केली जाईल. पात्रता आणि निकषांबद्दल अधिक माहितीसाठी, उमेदवारांनी अधिकृत अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

NHPC Ltd Trainee Officer & Trainee Engineer Recruitment 2024 l अशाप्रकारे अर्ज करा :

या भरतीसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन करिअर लिंकवर क्लिक करावे आणि त्यानंतर भरतीशी संबंधित लिंकवर क्लिक करून पुढे जावे. आता पुढे रिक्रूटमेंट पोर्टलवर जा आणि प्रथम नोंदणी करा आणि नंतर इतर माहिती भरून अर्ज प्रक्रिया पूर्ण करा. शेवटी उमेदवाराने विहित शुल्क भरून फॉर्म सबमिट करावा आणि पूर्णपणे भरलेल्या फॉर्मची प्रिंटआउट घेऊन ती सुरक्षित ठेवावी.

अर्ज शुल्क किती असणार? :

अनारक्षित, OBC (NCL) आणि EWS श्रेणीतील उमेदवारांना 600 रुपये भरावे लागतील. या भरतीमध्ये सहभागी होण्यासाठी माजी सैनिक आणि महिला उमेदवारांसह राखीव प्रवर्गातील उमेदवार विनामूल्य अर्ज करू शकतात.

News Title- NHPC Ltd Trainee Officer & Trainee Engineer Recruitment 2024

महत्त्वाच्या बातम्या –

EV सेगमेंटमध्ये लाँच होणार ही जबरदस्त कार! या तगड्या कारशी स्पर्धा करणार

यंदाचा IPL हंगाम असणार खास; या दिग्गज व्यक्तीची होणार एंट्री

“भाजपने स्वत:ची चड्डी सोडून काँग्रेसचं लंगोट बांधलंय”

LIVE सामन्यात बांगलादेशचे 4 खेळाडू गंभीर जखमी! एकजण रुग्णालयात दाखल

नागरिकांनो बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; अन्यथा अडचणींना सामना करावा लागेल