भाजपकडून पुण्यात आचारसंहितेचा भंग, रविंद्र धंगेकरांच्या आरोपांनी खळबळ

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

पुणे | निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच संपूर्ण देशात आचारसंहिता लागू झाली आहे. मात्र पुण्यात (Pune) भाजपकडून आचारसंहितेचा भंग करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी केला आहे.

भाजप जाणूनबुजून शहरभर कमळ या चिन्हाचे वॉल पेंटिंग करत असल्याचे काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल आहे. जर भाजप नेत्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही काँग्रेस पक्षाचे चिन्ह जिल्हाधिकाऱ्यांच्या केबिन बाहेर लावणार, असा इशारा काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर यांनी दिला आहे.

याप्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह काँग्रेस नेत्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच काँग्रेस नेत्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलंय. आता यावर जिल्हाधिकारी काय कारवाई करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

आचार संहिता म्हणजे काय ?

देशभरात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाने काही नियम घालून दिले आहेत. आयोगाच्या याच नियमांना आचार संहिता असं म्हटलं जातं. लोकसभा अथवा विधानसभा निवडणुकांदरम्यान या नियमांचं पालन करणं हे सरकार, नेतेमंडळी आणि राजकीय पक्षांसाठी बंधनकारक असतं.

आचारसंहिता काळात कोणत्या कामांवर असते बंदी?

आचारसंहिता काळात सरकारला धोरणात्मक निर्णय घेता येत नाहीत. कुठल्याही योजनेचे उद्घाटन किंवा अंमलबजावणी करता येत नाही. सरकारी कर्मचाऱ्यांची बदली व पदोन्नतीचे आदेश काढता येत नाहीत. परवानगीशिवाय घर, दुकान, जमीन किंवा आवारात बॅनर व पोस्टर्स लावता येणार नाहीत.

धार्मिक स्थळांचा प्रचारासाठी वापर करता येत नाही. निवडणुकीच्या प्रचार करताना सभा, रॅलीसाठी पोलिसांची परवानगी आवश्यक असते. निवडणुकीच्या प्रचारात सरकारी वाहन, कर्मचाऱ्यांचा वापर करण्यास मनाई असते.

महत्त्वाच्या बातम्या- 

“सुशांत सिंहसोबत जे घडलं तेच माझ्यासोबत घडलं”, अभिनेत्याचा गंभीर आरोप

राज ठाकरेंना शरद पवार गटाची खुली ऑफर!

आमलकी एकादशीचा दिवस ‘या’ 3 राशींसाठी अत्यंत शुभ ठरणार!

मोठी बातमी! अभिषेक घोसाळकरांच्या पत्नीच्या दाव्याने खळबळ

“तू सगळ्यात मोठा दरिद्री आहेस…”; किरण मानेंची पोस्ट व्हायरल