कडक उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Protection from Dehydration | राज्यात आता तापमानात वाढ होत आहे. दुपारी कडक ऊन पडत आहे. त्यामुळे दिवसा घराबाहेर पडणेही अवघड झालं आहे. उन्हामुळे शरीराची लाही लाही होत आहे. कडक उन्हाळ्यात एक समस्या कायम असते ती म्हणजे डिहायड्रेशन.

या काळात बहुतांश लोकांना डिहायड्रेशनची समस्या जाणवते. जेव्हा शरीरात पाण्याची तीव्र कमतरता असते आणि इलेक्ट्रोलाइट्सच्या प्रमाणात खूप फरक असतो तेव्हा ही समस्या उद्भवते. उलट्या, अतिसार, जास्त घाम येणे, छातीत जळजळ, मूत्रपिंड निकामी होणे आणि लघवीचे प्रमाण वाढवणारा पदार्थ वापरल्याने डिहायड्रेशनची समस्या निर्माण होते.

यापासून स्वतःचा बचाव कसा करता येईल, याबाबत सविस्तर माहिती सांगितली आहे. यासाठी तुम्ही काही सोपे उपाय करू शकता. या छोट्या बदलामुळे तुम्हाला हा त्रास जाणवणार नाही. तुम्ही जीवनशैलीमध्ये हे सोपे बदल केल्यास तुम्हाला खूप फायदा होईल.

मुबलक प्रमाणात पाणी प्या

शरीरात पाण्याची कमतरता झाल्यावर ही समस्या उद्भवते. सर्वसाधारणपणे 8 ते 10 ग्लास पाणी पिण्याची गरच प्रत्येक व्यक्तीला लागू होईलच असं नाही. त्यामुळे आपल्या शरीराला मुबलक प्रमाणात जेवढी आवश्यकता आहे तेवढं पाणी प्यायला हवं. पण, एक गोष्ट लक्षात ठेवा की एकाच वेळी जास्त पाणी पिणे योग्य नाही. कारण त्यामुळे किडनीवर दबाव येऊ शकतो.

हवामानानुसार कपडे घाला

उन्हाळ्यात खूप जाड आणि काळ्या रंगाचे कपडे घातल्यास प्रचंड घाम येतो. उन्हाळ्यात डिहायड्रेशन (Protection from Dehydration) टाळण्यासाठी हवामानास अनुकूल असलेले कपडे घाला. शक्यतो, हलके रंग आणि सुती कपडे निवडा. यामुळे तुम्हाला जास्त ऊन लागणार नाही.

‘या’ गोष्टी टाळा

अल्कोहोल आणि कॅफीन हे दोन सामान्य लघवीचे प्रमाण वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. ज्यामुळे जास्त लघवी होते आणि त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे कॅफीनयुक्त पदार्थ टाळले पाहिजेत.

योग्य आणि सकस आहार

उन्हाळ्यामध्ये (Protection from Dehydration) भरपूर पाणी असणाऱ्या कच्च्या भाज्या आणि फळांचा समावेश आहारामध्ये करावा. यामुळे तुमचे पाणी, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांचे प्रमाण वाढते. उन्हाळ्यात टरबूज आणि काकडीचे सेवन करायला हवे. यामुळे शरीरात पाण्याची कमतरता होत नाही.

News Title- Protection from Dehydration
महत्त्वाच्या बातम्या –

त्वचा आणि केसांच्या समस्यांनी त्रस्त आहात? तर शरीरात या जीवनसत्वाची असू शकते कमतरता

अखेर प्रतीक्षा संपली! आता व्हॉट्सॲप स्टेटसवर इतक्या मिनिटांचा व्हिडीओ अपलोड करता येणार

अगदी काही मिनिटांत घरबसल्या ड्रायव्हिंग लायसन्स मिळवू शकता! अशाप्रकारे करा अर्ज

इंजिनियर्स तरुणांना सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! या विभागात भरती प्रक्रिया सुरु

EV सेगमेंटमध्ये लाँच होणार ही जबरदस्त कार! या तगड्या कारशी स्पर्धा करणार