‘घरफोड्या देवेंद्र फडणवीसांना जेलमध्ये टाकलं पाहिजे’; ठाकरे कडाडले

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Uddhav Thackeray | आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षाच्या नेत्यांचं सभा सत्र सध्या राज्यात सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनीही निवडणुकीसाठी सभांचा धडाका लावला आहे. सध्या ते हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

यावेळी उमरखेड येथे त्यांनी जनसंवाद मेळाव्यातून जनतेशी संवाद साधला. याच सभेत उद्धव ठाकरे यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde), पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावरही त्यांनी सडकून टीका आहे. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही घणाघात केला.

“फडणवीसांना जेलमध्ये टाकलं पाहिजे”

उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचा चांगलाच समाचार घेतला. एकदा फडणवीस म्हणाले होते की, मी परत आलो, दोन घरं फोडून आलो. खरं पाहायला गेलं तर, दुसऱ्यांची घरं फोडल्यामुळे फडणवीस यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे. जरांगे यांच्या आंदोलनावेळी तुम्ही महिलांवर लाठीचार केला, अशी टीका उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी यावेळी केली.

पुढे ते म्हणाले की,  माझा पक्ष आणि बाण चोरला. पण, मी जिथे जातो तिथे गर्दी वाढते. यामुळे त्यांच्या पोटात दुखतं. नवीन समीकरण झाल्यानंतर ही पहिली निवडणूक आहे. हे समीकरण करून आपण सरकार चालवलं, त्या काळात सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून नाव माझं होतं.

“उत्तम घरफोड्या म्हणून फडणवीसांचं नाव घेतलं जाईल”

आता निवडणूक जवळ आली आहे. हे म्हणतात सरकार आपल्या दारी पण हे सरकार अमित शाह यांच्या दारी आहे. राज्यात नुसता कटपुतलीचा खेळ चालू आहे. मिंधेंना भरपूर दिलं पण काहींना भस्म्या रोग असतो, असा टोला लगावत यावेळी उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

देवेंद्र फडणवीस हे देशाच्या राजकारणातील ‘उत्तम घरफोड्या’ आहेत. त्यांची ही ओळख इतिहासात झाल्याशिवाय राहणार नाही. ‘मी दोन पक्ष फोडले’ सांगून फडणवीसांनी मिध्यांचं ‘हिंदुत्वासाठी पक्ष सोडला’ हे भांडं फोडलं आहे. अशी टीका करत भाजपला घरफोडीचं एक लायसन्स द्या, आणि पक्ष चिन्ह कमळ सोडून हातोडा द्या, असा टोलाही यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी लगावला.

News Title : Uddhav Thackeray Target Devendra Fadnavis

महत्त्वाच्या बातम्या-

रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले…

‘मला फक्त दिल्लीत…’; राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केलं घर; किंमत ऐकून बसेल धक्का

भावा पाठोपाठ आता वहिनींचाही ‘दादां’ना विरोध, म्हणाल्या ‘शेवटी कुटुंब हे’

‘रोहित माझ्या नेतृत्वात…’; हार्दिक पांड्याचं रोहित शर्माबद्दल मोठं वक्तव्य