रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Rohit Pawar | आगामी लोकसभा निवडणूक आता तोंडावर आली आहे. अशातच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि पुत्र अमित ठाकरे हे रात्रीच दिल्लीला रवाना झाले आहेत. यामुळे आता महायुतीमध्ये राज ठाकरे यांना सामावून घेणार का? याबाबत चर्चा सुरू आहे. गेली अनेक दिवस राज ठाकरे आणि भाजपमध्ये चर्चा सत्र सुरू आहे. अशातच आता राज ठाकरे दिल्लीला गेले असून लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेसाठी तयारी करताना दिसत आहेत. यापार्श्वभूमीवर आता शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी मनसेला ऑफर दिली आहे.

राज ठाकरे यांनी भाजपकडे जाण्याऐवजी आमच्याकडे यावं. महाराष्ट्रामध्ये भाजप नाहीतर महाविकास आघाडीची हवा असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले. त्यानंतर 2019 मध्ये भाजपने छोट्या पक्षांना फाट्यावर मारलं होतं. दोन पक्ष फोडून झाले आणि तरीही त्याचा काही फायदा होणार नाही असं लक्षात आलं तेव्हा आता मनसेला युतीत घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले.

काय म्हणाले रोहित पवार?

“मी राज ठाकरे यांच्या भाषणाचा फॅन आहे. मनसेनं भाजपऐवजी महाविकास आघाडीमध्ये जावं. भाजपसोबत जाण्याऐवजी त्यांनी विचार करावा. 2019 मध्ये भाजपने छोट्या पक्षांना फाट्यावर मारलं होतं. भाजपसोबत असलेल्या दोन पक्षाचा त्यांना फायदा दिसत नाही, म्हणून आता ते छोट्या पक्षाला भाव देऊ लागले आहेत. महाराष्ट्र धर्माचे पालन करण्यासाठी राज ठाकरे यांनी महाविकास आघाडीसोबत यावं”, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.

“महाराष्ट्रातील लहान पक्ष सोबत घेत भाजप मतांचे ध्रुवीकरण करत आहे. राज्यातील जनता भाजपसोबत नाही, हे लक्षात आलं पाहिजे. दोन्ही पक्ष फोडून त्यांच्यापासून काहीही एक उपयोग होत नसल्याचं त्यांच्या ध्यानात आलं आहे. यामुळे ज्या पक्षांना पाच वर्षांपूर्वी महत्त्व दिले जात नव्हते, त्याची आठवण आता भाजपला आली आहे,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

रोहित पवार यांच्याकडून गौप्यस्फोट

रोहित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. “अजित पवार गटातील एक नेता आणि कृषी खात्याशी असलेला मंत्र्याने दीड महिन्यापूर्वी राजीनामा दिला आहे. मंत्री कृषी खात्याशी निगडीत असल्याची माहिती समोर आली आहे. आता अजितदादा गटातील अनेक आमदार भाजपत तरी जाणार, नाहीतर आमच्याकडे येणार”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे भाजपशी हातमिळवणी करणार असल्याच्या चर्चा आहेत. आता तर ते लोकसभा निव़डणुकीच्या पार्श्वभूमीवर अमित शहांसोबत बैठक घेणार आहेत. बैठकीमध्ये काय घडेल हे येणाऱ्या वेळेतच समजेल.

News Title – Rohit Pawar Offer To MNS Raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

EV सेगमेंटमध्ये लाँच होणार ही जबरदस्त कार! या तगड्या कारशी स्पर्धा करणार

यंदाचा IPL हंगाम असणार खास; या दिग्गज व्यक्तीची होणार एंट्री

“भाजपने स्वत:ची चड्डी सोडून काँग्रेसचं लंगोट बांधलंय”

LIVE सामन्यात बांगलादेशचे 4 खेळाडू गंभीर जखमी! एकजण रुग्णालयात दाखल

नागरिकांनो बँकेची कामे लवकरात लवकर उरकून घ्या; अन्यथा अडचणींना सामना करावा लागेल