ऐश्वर्या रायने ‘त्या’ खास व्यक्तीसाठी केली भावूक पोस्ट…!

Aishwarya Rai | बाॅलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय कायमच चर्चेत असते. ती तिच्या प्रोफेशनल लाईफ बरोबरच तिच्या खाजगी आयुष्यात देखील चर्चेचा विषय ठरते. ऐश्वर्या आणि अभिषेक या दोघांच्या नात्यामध्ये दुरावा असल्याचं म्हटलं होतं. मात्र, दोघांनी देखील या चर्चांवर भाष्य केलेलं नाहीये. अनंत आंबानीच्या प्री वेडिंग दरम्यान, ऐश्वर्या संपूर्ण बच्चन कुटुंबासोबत येथे उपस्थित होती. सोशल मीडियावर ऐश्वर्या आपल्या चाहत्यांसाठी काही न काही पोस्ट करत असते. सोशल मीडियावर सक्रिय राहून ती चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. मात्र सध्या चर्चा आहे ते ऐश्वर्याने शेअर केलेल्या पोस्टची.

पोस्टमध्ये काय लिहिलं?

ऐश्वर्याचे (Aishwarya Rai) वडिला कृष्णराज राय यांचं निधन 2017 ला झालं. आपल्या वडिलांच्या अठवणीत ऐश्वर्या सोशल मीडियावर कायम वेगवेगळे पोस्ट फोटोज शेअर करत असते. दरम्यान ऐश्वर्याने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर वडिल कृष्णराज राय यांच्या पुण्यतिथी निमित्ताने तिने हा फोटो शेअर केला आहे. वडिलांचा फोटो शेअर करत ऐश्वर्याने त्याला भावूक कॅप्शन दिलं आहे.

‘प्रिय बाबा….’; –

ऐश्वर्याने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘माझे प्रिय डॅडी आणि अज्जा, मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करते, तुम्ही दिलेल्या आर्शिवादासाठी धन्यवाद’. सध्या सोशल मीडियावर ऐश्वर्याची पोस्ट व्हायरल होत आहे. एवढंच नाहीतर, चाहते देखील अभिनेत्रीच्या पोस्टवर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव करत आहेत. ऐश्वर्याच्या पोस्टवर एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, ‘ऐश्वर्याने घरात बसून स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय’ यांसारख्या अनेक कमेंट ऐश्वर्याच्या सोशल मीडिया पोस्टवर करण्यात आल्या आहेत. सांगायचं झालं तर, गेल्या काही दिवसांपासून ऐश्वर्या तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.

सासूने केले आरोप-

ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिषेक बच्चन यांच्या सततच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे चाहत्यांमध्ये चिंतेचं वातावरण बघायला मिळत आहे. शिवाय काही दिवसांपूर्वी सासू जया बच्चन आणि नणंद श्वेता बच्चन या दोघींनी देखील ऐश्वर्यावर आरोप केले होते.

News Title :  Aishwarya Rai shares a post on Instagram

महत्त्वाच्या बातम्या-

“मुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा हक्क असल्याने हिंदू जळतात”

रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले…

‘मला फक्त दिल्लीत…’; राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केलं घर; किंमत ऐकून बसेल धक्का

भावा पाठोपाठ आता वहिनींचाही ‘दादां’ना विरोध, म्हणाल्या ‘शेवटी कुटुंब हे’