जावेद अख्तर यांचा पहिल्या लग्नाबाबत मोठा खुलासा!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Javed Akhtar | प्रसिद्ध पटकथा लेखक, गायक जावेद अख्तर नेहमीच त्यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. त्यांनी नुकतीच एक मुलाखत दिली. यामध्ये त्यांनी आपल्या पहिल्या लग्नाविषयी मोठा खुलासा केला. एका सवयीमुळे त्यांना काय गमवावं लागलं, याबाबत त्यांनी या मुलाखतीमध्ये बोलून दाखवलं.

जावेद अख्तर यांच्या पहिल्या पत्नीचं नाव हनी इरानी आहे. त्यांनी 1972 मध्ये लग्न केलं होतं आणि लग्नाच्या 12 वर्षांनंतर त्यांनी एकमेकांना घटस्फोट दिला. पहिल्या पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर जावेद अख्तर यांनी अभिनेत्री शबाना यांच्याशी दुसरं लग्न केलं.

आता लग्नाच्या जवळपास 40 वर्षांनंतर जावेद अख्तर त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल व्यक्त झाले आहेत. यावेळी त्यांनी विभक्त होण्याचं कारणही सांगितलं आहे. एका मुलाखतीत जावेद अख्तर यांनी पहिलं लग्न तुटण्याचं खरं कारण सांगितलं आहे.

पहिलं लग्न ‘या’ कारणामुळे मोडलं

“मला खात्री आहे की मी जर दारूचं व्यसन सोडलं असतं किंवा मला याचं व्यसनच नसतं तर मी आणखी जबाबदार असतो, तर आमची कथा थोडी वेगळी असती”, अशी खंत जावेद अख्तर यांनी व्यक्त केली. हनी इरानी यांच्याशी बऱ्याच काळापूर्वी घटस्फोट झाला असला तरी आजही त्यांच्याशी चांगली मैत्री असल्याचं अख्तर (Javed Akhtar) यांनी सांगितलं.

“माझी पहिली पत्नी हनी इरानी एक व्यक्ती म्हणून खूप चांगली आहे आणि आजही मी तिचा तितकाच आदर करतो. ती माझी आजही सर्वांत चांगली मैत्रीण आहे”, असंही जावेद अख्तर म्हणाले आहेत. पुढे त्यांना त्यांच्या दुसऱ्या पत्नी शबाना आझमी यांच्याबद्दलही सवाल करण्यात आला. 1984 मध्ये शबाना आझमी आणि जावेद अख्तर यांनी लग्न केलं.

जावेद अख्तर यांचा खुलासा

शबाना आझमी यांनी तुमच्या दारूच्या व्यसनाशी कसं डील केलं?, असा सवाल या मुलाखतमध्ये जावेद अख्तर यांना करण्यात आला. यावर ते म्हणाले की, “सुरुवातीची दहा वर्षे तिने सांभाळून घेतलं. मात्र नंतर तिने दारूचं व्यसन असलेल्या व्यक्तीशीच लग्न केलं. लग्नाच्या काही काळानंतर मी दारूचं व्यसन सोडलं आणि पुन्हा कधीच त्याच्या वाटेला गेलो नाही.” जावेद अख्तर (Javed Akhtar) यांची ही मुलाखत आता चर्चेत आली आहे.

News Title- Javed Akhtar big revelation about first marriage

महत्त्वाच्या बातम्या –

वसंत मोरेंचं ठरलं?; ‘या’ पक्षात जाणार?

ग्राहकांना मोठा धक्का; सोनं महागलं, जाणून घ्या दर

चाहत्यांची चिंता वाढली, प्रेग्नंट दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय

‘तुझी खरी लायकी फक्त…’; मिटकरींनी काढली रोहित पवारांची लायकी

अजित पवारांनी न्यायालयाची आणि जनतेची माफी मागावी; शरद पवार गट आक्रमक