Samantha Ruth Prabhu | दाक्षिणात्य अभिनेत्री समंथा प्रभू सतत चर्चेत असते. समंथाची सोशल मीडियावर सुद्धा जबरदस्त फॅन फोलोइंग आहे. पुष्पा या चित्रपटातील आयटम साँगमध्ये समंथाने आपली उत्तम कामगिरी बजावली. उ अंटावा या गाण्यामधील तिने केलेल्या नृत्याने तरुणांना आक्षरशः वेड लावलं. अभिनेत्री सोशल मीडियावर कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नवनवीन व्हिडीओज आणि फोटो शेअर करत असते. समंथा कायम तिच्या प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असते. मात्र, आता ती तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे.
काय आहे प्रकरण?
एका मुलाखतीमध्ये बोलत असताना समंथाने (Samantha Ruth Prabhu) तिच्या आजाराबद्दल आणि लैगिंकतेबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे. बोलत असताना समंथा म्हणाली की, गेल्या काही दिवसांपासून मी एका आजारामुळे प्रचंड त्रस्त होते. मला ऑटोइम्यून मायोसिटिस या आजार झाला होता. त्यामुळे काही दिवस माझ्यासाठी खूप कठीण होते. आता या आजारातून बाहेर पडत समंथाने काम करायला सुरुवात केली आहे.
पुढे ती म्हणाली की, पुष्पा या चित्रपटातील उ अंटावा या गाण्यावर डान्स करणं माझ्यासाठी फार कठीण होतं. मला स्वतःला मी सुंदर आहे, असं कधीच नाही वाटलं. स्वतःला मी कायम दुय्यम लेखत आले. मला असं वाटायचं की, मी इतर मुलीसांरखी दिसत नाही.
गाण्याच्या शाॅटसाठी तयार नव्हते-
समंथा (Samantha Ruth Prabhu) म्हणाली की, “उ अंटावा च्या पहिल्या शॉटदरम्यान मी भीतीने थरथर कापत होते. त्या शॉटसाठी मी तयार नव्हते. कारण सेक्सी दिसणं हे माझ्या तत्वात बसत नाही. मनामध्ये नेहमीच संशयकल्लोळ सुरु असायचा त्यामुळे मी लैंगिकतेबाबत नेहमीच अस्वस्थ राहिले आहे. पण या गाण्यानंतर मी अभिनेत्री आणि एक व्यक्ती म्हणून देखील समृद्ध झाले. स्वत:ला अडचणीत टाकण्याचा नेहमीच मी प्रयत्न केला आहे”.
“I have been uncomfortable with my sexuality. During the first shot of ‘Oo Antava’ I was shaking from fear,” said @Samanthaprabhu2 #IndiaTodayConclave24 #SamanthaRuthPrabhu #movies | @Akshita_N pic.twitter.com/7ZaTOxBZXs
— IndiaToday (@IndiaToday) March 15, 2024
समंथाची चर्चा-
सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याच्या ‘पुष्पा’ (Pushpa) या सिनेमातील ‘उ अंटावा’ या गाण्याने धुमाकूळ घातला होता. समंथाच्या बोल्ड आणि हाॅट अंदाजांमुळे तिच्या चाहत्यांमध्ये कायम चर्चा असते. दरम्यान वरुण धवनच्या (Varun Dhawan) आगामी ‘सिटाडेल’ या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री दिसणार आहे. तसेच एका हॉलिवूड चित्रपटाचाही अभिनेत्री भाग आहे.
News Title : Samantha Ruth Prabhu reveals the truth
महत्त्वाच्या बातम्या-
शहांसोबतच्या भेटीबाबत बाळा नांदगावकरांनी दिली महत्त्वाची माहिती!
अमोल कोल्हेंविरोधात ‘हा’ नेता लढणार?; दिलीप वळसेंच्या बंगल्यावर खलबतं
जावेद अख्तर यांचा पहिल्या लग्नाबाबत मोठा खुलासा!
महेंद्रसिंग धोनीने मारला आयकॉनिक ‘हेलिकॉप्टर शॉट’! व्हिडीओ व्हायरल
राज्यातील ‘या’ भागांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा