राज्यातील ‘या’ भागांत वादळी वाऱ्यासह गारपीटीची शक्यता; हवामान विभागाचा इशारा

Weather Update | राज्यात तापमानामध्ये वाढ होत आहे. उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. आता दिवसा घराबाहेर पडणं देखील अवघड झालं आहे. तर,काही भागांमध्ये याउलट वातावरण दिसून येतंय. विदर्भामध्ये भर उन्हाळ्यात पावसाने हजेरी लावली आहे. तसंच देशातही काही ठिकाणी उन्हाळ्यामध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत. मध्य प्रदेशपासून पश्चिम बंगालपर्यंतच्या भागात पावसाने हजेरी लावली आहे.

याचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसून आला आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळत आहे. पुढील 48 तासांत पावसाची शक्यता कायम असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

विदर्भाला पावसानं झोडपलं

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, राज्यासह देशात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता कायम आहे. राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. आता पुढील 48 तासांत पुन्हा जोरदार पाऊस (Weather Update) पडणार आहे.

विदर्भाकडील भागांमध्ये गारपीटही झाली आहे. भंडाऱ्याच्या साकोली तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट होऊन पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अवकाळी पावसामुळे शेतातील मका, गहू, भात पीक यासह बागायती शेती आणि पालेभाज्यांच्या शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

पुढील 48 तासांत पावसाची शक्यता कायम

भंडारासह गोंदियामध्येही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला. हवामान विभागाने विदर्भात तीन दिवस वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यात वर्तविली होती. हा अंदाज खरा ठरला असून काल (19 मार्च)दुपारपासून गोंदिया जिल्ह्यात वादळी वारा सुरू होता. तर, सायंकाळी सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला.

नागपूरमध्येही गाऱ्यांचा पाऊस (Weather Update ) झाला आहे. गारपीटीमुळे परिसरातील शेतीचं बरंच नुकसान झालं आहे. तसंच चंद्रपूरमध्येही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. विदर्भ आणि नजीकच्या भागांमधील हवामानाची ही स्थिती पाहता हवामान विभागाने या ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. राज्याच्या उर्वरित भागात मात्र उन्हाचा तडाखा आणखी तीव्र होणार असल्याचं हवामान विभागाने म्हटलं आहे.

News Title : Weather Update in maharashtra

महत्त्वाच्या बातम्या-

‘मिर्झापूर 3’ च्या पोस्टरवरून चाहते भडकले; नेमकं घडलं तरी काय?

अजित पवारांना मोठा झटका; एका ओळीचं पत्र लिहीत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

बच्चन कुटुंबात पुन्हा वाद?; सासूमुळे ऐश्वर्याला कोसळलं रडू, पाहा व्हिडीओ

राज ठाकरे अमित शहांच्या भेटीत काय ठरलं?, मोठी माहिती समोर

रस्त्यावर नमाज पठण करण्याबाबत जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!