अजित पवारांना मोठा झटका; एका ओळीचं पत्र लिहीत ‘या’ नेत्याने दिला राजीनामा

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

NCP Resign | आगामी लोकसभा निवडणूक जवळ आली आहे. अशात अजित पवार गटाला मोठा धक्क बसला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील नेत्याने राजीनामा (NCP Resign) दिला असल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार गटातील नेत्याने दिला राजीनामा

राजीनामा (NCP Resign) दिलेल्या नेत्याचं नाव हे बजरंग सोनवणे आहे. बजरंग सोनवणे यांनी सुनिल तटकरे यांना राजीनामा सादर केला आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करत आहे”, असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर यांना सुपूर्द केला आहे. (NCP Resign)

resignation

काही दिवसांआधी पारनेरचे आमदार निलेश लंके हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून शरद पवार गटामध्ये आले आहेत. निलेश लंके यांना अहमदनगरमधून लोकसभा निवडणुकीची उमेदवारी देण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. निलेश लंके यांना शरद पवार गटातून उमेदवारी देण्यात येणार आहे.

शरद पवार गटात प्रवेश करणार

अजित पवार गटातून आणखी काही नेते हे पक्षातून बाहेर पडतील, असं शरद पवार गटाचे नेते आणि आमदार रोहित पवार म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बजरंग सोनवणे यांनी पक्षातून राजीनामा (NCP Resign) दिला असल्याने आता हे नेते शरद पवार गटामध्ये जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

कोण आहेत बजरंग सोनवणे

बजरंग सोनवणे यांनी अजित पवार गटातून राष्ट्रवादी काँग्रेसमधून राजीनामा घेतला आहे. आता त्यांनी आपली पुढची वाट देखील ठरवली आहे. ते आता शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आता समोर आली आहे.

शेतकरी पुत्र म्हणून बजरंग सोनवणे यांची ओळख आहे. बीड जिल्हा परिषदेचे त्यांनी याआधी काम पाहिलं होतं, त्यांनी आधी बीड जिल्हा परिषदेचं उपाध्यक्ष म्हणून काम केलं आहे. बीड जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे तत्कालीन अध्यक्ष आहेत.

News Title – NCP Resign Bajrang Sonawane News Update

महत्त्वाच्या बातम्या

राज ठाकरे अमित शहांच्या भेटीत काय ठरलं?, मोठी माहिती समोर

रस्त्यावर नमाज पठण करण्याबाबत जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य!

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय!

पोलिसांचा मनोज जरांगेंना मोठा धक्का!

वसंत मोरेंचं ठरलं?; ‘या’ पक्षात जाणार?