पोलिसांचा मनोज जरांगेंना मोठा धक्का!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Manoj Jarange Patil | मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) मराठा आरक्षणासाठी अनेक दिवसांपासून झटत आहेत. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सामावून घ्यावं आणि सगेसोयरेची अंमलबजावणी करावी, अशी मुख्य मागणी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांची आहे.

मनोज जरांगे यांच्या सभेला परवानगी नाही

मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीडच्या परळी वैजनाथ येथे सभा घेतली होती. मात्र परळी वैजनाथ पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सभेला परवानगी दिली नाही. यामुळे आता मनोज जरांगे (Manoj Jarange Patil) हे औरंगाबाद खंडपीठामध्ये धाव घेतली.

मनोज जरांगे यांची आज (20 मार्च) सभा होती. ही सभा परळी येथील मार्केट यार्ड येथे सायंकाळी 6 वाजता होणार होती. सकल मराठा समाजाच्या वतीने ही सभा होणार आहे अशी माहिती समोर आली आहे. या बैठकीची जनतेला माहिती व्हावी, यासाठी ध्वनिक्षेपक ऑटोरिक्षाला लावून त्यामाध्यमातून माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी परळी शहर आणि संभाजीनगरचे पोलीस निरिक्षकांकडे 13 मार्चला अर्ज करण्यात आला.

16 मार्चला बीड पोलिसांकडून काही अटी शर्ती घेतल्या. तसेच जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज दाखल केला. पण लोकसभेची आचारसंहिता दाखल झाल्याने परळी वैजनाथ पोलिसांनी मनोज जरांगे यांच्या सभेला परवानगी दिली नाही. जात, धर्म आणि भाषेवर एकत्र येऊ नका, असा आदेश देण्यात आला.

मनोज जरांगे यांच्यावर 8 गुन्हे दाखल

मागील काही महिन्यांमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्यावर एकूण 8 गुन्हे दाखल केले आहेत. मागील काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील यांच्या अडचणीमध्ये वाढ होत आहेत. मागील आठवड्यामध्ये दोन दिवसांमध्ये पाच गुन्हे दाखल केले आहेत.

मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाबाबत अंतरवाली सराटीमध्ये 24 मार्च रोजी महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीला राज्यभरातील आणि इतर राज्यातील मराठा बांधव उपस्थित राहणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र राज्यात लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाच्या आचारसंहिता लागू आहे. यामुळे या बैठकीला पोलिसांकडून परवानगी मिळणार का?, हे पाहणं महत्त्वाचं आहे.

News Title – Manoj Jarange Patil Meeting At Beed News Update

महत्त्वाच्या बातम्या

चाहत्यांची चिंता वाढली, प्रेग्नंट दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय

‘तुझी खरी लायकी फक्त…’; मिटकरींनी काढली रोहित पवारांची लायकी

अजित पवारांनी न्यायालयाची आणि जनतेची माफी मागावी; शरद पवार गट आक्रमक

पुण्यात सरकारी नोकरीची संधी! 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज