लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिस आयुक्तांनी घेतला मोठा निर्णय!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Pune News | आगामी लोकसभा निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे देशासह राज्यात देखील आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवरच पुणे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी मोठा निर्णय घेतला आहे.

लोकसभा निवडणुकीत सुरक्षेच्या दृष्टीने आणि कायदा सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलीस पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमारांनी महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार पुण्यातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

पुण्यातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढली

सुरक्षासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता असते. निवडणुका असल्याने कायदे व्यवस्था कायम ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यामध्ये पुणे (Pune News) शहरातील विविध राजकीय पक्षांचे नेते, बांधकाम व्यावसायिक, सामाजिक कार्यकर्ते अशी एकूण 85 जणांची सुरक्षा काढण्यात आली आहे.

यासोबतच आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमार्फत शासकीय जागेतील 11 हजार 83, सार्वजनिक मालमत्तेच्या ठिकाणचे 19 हजार 652 आणि खाजगी जागेवरील 1 हजार 815 असे एकूण 32 हजार 550 जाहिरातीचे फलक, भिंतीवरील लेखन, पोस्टर्स, फलक, बॅनर व ध्वज हटविण्यात आले आहेत.

अमितेशकुमार यांचा मोठा निर्णय

लोकसभा निवडणूक पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे म्हणून सर्व उपाययोजना केल्या जात आहे. त्यातीलच एक भाग म्हणजे सर्व राजकीय पोस्टर्स आणि बॅनर्स काढण्यात आले आहेत.

पुण्यात (Pune News) साधारण 110 जणांना सुरक्षा दिली जात असल्याची माहिती आहे. यासाठी अंदाजे 350 पेक्षा जास्त पोलिस कर्मचाऱ्यांचा वापर करण्यात येत होता. आता लोकसभा निवडणुका असल्याने मनुष्यबळ कमी पडू नये म्हणून 85 जणांची सुरक्षा  काढण्यात आली आहे.

News Title- Pune News Security of 85 dignitaries of Pune has been withdrawn

महत्वाच्या बातम्या-

चाहत्यांची चिंता वाढली, प्रेग्नंट दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय

‘तुझी खरी लायकी फक्त…’; मिटकरींनी काढली रोहित पवारांची लायकी

अजित पवारांनी न्यायालयाची आणि जनतेची माफी मागावी; शरद पवार गट आक्रमक

पुण्यात सरकारी नोकरीची संधी! 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज