चाहत्यांची चिंता वाढली, प्रेग्नंट दीपिका पादुकोणने घेतला मोठा निर्णय

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Deepika Padukone | अभिनेत्री दीपिका पादुकोण लवकरच बाळाला जन्म देणार आहे. दीपिका आणि रणवीर सिंह लवकरच आई-बाबा होणार आहेत. दीपिकाने सोशल मिडियावर पोस्ट करत चाहत्यांना ही गुड न्यूज दिली होती. आता दीपिका पुन्हा चर्चेत आली आहे.

दीपिकाने गरोदर असताना मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चाहत्यांची चिंता वाढली आहे. दीपिका पादुकोण हिच्या डिलीवरीबद्दल ही अपडेट समोर आली आहे. दीपिका आपल्या बाळाला भारतात जन्म देणार की विदेशात याबाबत ही चर्चा होत आहे.

दीपिका देणार पहिल्या बाळाला जन्म

अशातच एका रिपोर्टनुसार असं म्हटलं जातंय की, दीपिकाला आपल्या बाळाला भारतामध्येच जन्म द्यायचा आहे. दीपिका पादुकोण हिची डिलीवरी तिच्या आईच्या घरी होणार आहे. बंगळुरूमध्ये दीपिका (Deepika Padukone) आपल्या पहिल्या बाळाला जन्म देणार असल्याचं म्हटलं जात आहे.

दीपिकाला तिच्या होम टाउन म्हणजेच बंगळुरूमध्ये डिलिव्हरी करायची आहे. याबाबत रणवीर आणि दीपिका या दोघांनीही अधिकृत अशी कोणतीच माहिती दिली नसली तरी काही रिपोर्टनुसार याबाबत जोरदार चर्चा होत आहेत. त्यामुळे चाहतेही चिंतेत पडले आहेत.

दीपिकाने घेतला मोठा निर्णय

दीपिका सप्टेंबर 2024 मध्ये बाळाला जन्म देणार आहे. त्यामुळे ती सध्या जास्त व्यस्त आहे. या काळात दीपिका आपली संपूर्ण कामे उरकण्यात व्यस्त आहे. लवकरच ती आगामी चित्रपट कल्की 2098 एडी या चित्रपटाचं प्रमोशनही करणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान, वयाच्या 38 व्या वर्षी दीपिका (Deepika Padukone) तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे.दीपिका आणि रणवीर हे बॉलिवूडमधील फेमस कपलपैकी एक आहेत. ‘रामलीला’ चित्रपटाच्या सेटवर दोघांची प्रेमकहाणी सुरू झाली. 2012 मध्ये त्यांनी डेटिंगला सुरुवात केली. त्यानंतर 2018 मध्ये दोघांनी इटलीतील लेक कोमो येथे डेस्टिनेशन वेडिंग केलं. आता दोघेही लवकरच आई-बाबा होणार आहेत.

News Title- Big Update About Deepika Padukone Delivery

महत्वाच्या बातम्या-

पुण्यात सरकारी नोकरीची संधी! 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार

यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज

आमलकी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त

दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अभिमानच; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा

आजचे राशिभविष्य! ब्रह्म व इंद्र योगाने आजचा दिवस होईल शक्तिशाली