दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अभिमानच; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा

Javed Miandad | पुढील वर्षी पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले जाणार आहे. आशिया चषक 2023 चे देखील यजमानपद पाकिस्तानकडे होते, पण सुरक्षेच्या कारणास्तव भारतीय संघ पाकिस्तानात गेला नाही. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत खेळवले गेले. भारताने नेहमीच सावध भूमिका घेत पाकिस्तान दौऱ्यावर जाणे टाळले आहे. याचे कारणही तसेच असल्याचे वारंवार दिसून आले आहे. आता याचाच प्रत्यय देणारे विधान पाकिस्तानच्या माजी खेळाडूने केले आहे.

जेव्हा-जेव्हा पाकिस्तान आणि भारत यांच्यातील संबंध सुधारताना दिसतात, तेव्हा पाकिस्तानी असे काही करतात की त्यांच्यापासून दूर राहणेच योग्य वाटते. पाकिस्तानच्या एका माजी क्रिकेटपटूने केलेल्या खुलाशामुळे खळबळ माजली आहे. माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू जावेद मियांदादने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमसोबतचे आपले संबंध उघडपणे कबूल केले आहेत आणि त्याचा आपल्याला अभिमान असल्याचे त्याने सांगितले.

माजी क्रिकेटपटूचा खुलासा

पाकिस्तानमध्ये एका मुलाखतीदरम्यान त्याने हा धक्कादायक खुलासा केला. मियांदादने दाऊदला बऱ्याच काळापासून ओळखत असल्याची कबुली दिली आणि दुबईतील त्यांच्या पहिल्या भेटीबद्दल भाष्य केले. मियांदादने दोघांमधील कौटुंबिक नात्याबद्दलही सांगितले आहे.

मियांदाद म्हणाला की, त्याच्या मुलीचे माझ्या मुलाशी लग्न झाले आहे, ही माझ्यासाठी सन्मानाची बाब आहे. आमच्या मुलांमधील कौटुंबिक बंधनाला त्याने दिलेली मान्यता त्याच्या नात्याची खोली दर्शवते, हे नाते आजपर्यंत लोकांच्या नजरेपासून लपलेले आहे. मोठ्या प्रमाणात लोक त्याची निंदा करतात पण त्याचा खरा चेहरा आम्हाला माहिती आहे.

Javed Miandad कडून दाऊदचे कौतुक

दाऊदचे कौतुक करताना मियांदाद पुढे म्हणाला की, अंडरवर्ल्ड गँगस्टरने मुस्लिम समुदायासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. दाऊदने मुस्लिम समाजासाठी जे काही केले ते सोनेरी शब्दात लिहिले जाईल, अशा शब्दांत मियांदादने दाऊदचे तोंडभरून कौतुक केले.

दरम्यान, ICC क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समाविष्ट असलेला मियांदाद हा पाकिस्तान क्रिकेटमधील मोठा चेहरा आहे. मियांदादने अनेक बहुचर्चित सामन्यांमध्ये पाकिस्तानला विजय मिळवून दिला. मियांदादचे दाऊदशी जवळचे संबंध आहेत, कारण त्याचा मुलगा जुनैद याचे अंडरवर्ल्ड डॉनची मुलगी माहरुखशी 2005 मध्ये लग्न झाले आहे.

News Title- Former Pakistan cricketer Javed Miandad said that he is proud to be associated with Dawood Ibrahim
महत्त्वाच्या बातम्या –

IPL मध्ये कॉमेंट्रीसाठी दिवसाला एवढे लाख मिळतात; नवज्योतसिंग सिद्धूंनी सांगितलं मानधन

आयकरातून भारत सरकारची बक्कळ कमाई; कर संकलनात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ!

महायुतीत मनसेची ‘जागा’ पक्की? राज ठाकरेंना मुंबईतील एक जागा मिळण्याची शक्यता!

मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली! IPL सुरू होण्याआधीच स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर?

‘माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजप…’; सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट