महायुतीत मनसेची ‘जागा’ पक्की? राज ठाकरेंना मुंबईतील एक जागा मिळण्याची शक्यता!

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Raj Thackeray | आगामी लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत होणार आहे. महायुतीत आणखी एक पक्ष सहभागी होण्याची शक्यता असून, त्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचाली सुरू आहेत. दिल्लीत राजकीय हालचालींना वेग आला आहे. एनडीएला आणखी एक साथीदार मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिल्लीत अमित शहा यांची भेट घेतली.

माहितीनुसार, राज ठाकरे लोकसभेच्या दोन जागांची मागणी करत आहेत. दक्षिण मुंबईची जागा मनसेला मिळू शकते. राज ठाकरेंच्या येण्याने मराठी मतदारांचा कल वाढण्याची भाजपला आशा आहे. मनसेच्या 2.25 टक्के व्होट बँकेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्याचवेळी उद्धव ठाकरेंना मिळणारी सहानुभूती कमी होऊ शकते.

मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता

राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या प्रतिमेमुळे मतदार आकर्षित होऊ शकतात, असे भाजप नेतृत्वाला वाटते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी एकही उमेदवार उभा केला नव्हता. त्यांनी एनडीएविरोधात प्रचार केला होता. गेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे आणि भाजप एकत्र लढले होते.

2019 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी 101 जागांवर उमेदवार उभे केले होते. कल्याण ग्रामीण ही केवळ एक जागा मनसेने जिंकली. 86 उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. मनसेला 2.25 टक्के मते मिळाली. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेला 1.5 टक्के मते मिळाली होती. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेला 3.1 टक्के मते मिळाली होती.

Raj Thackeray महायुतीत सहभागी होणार?

2009 च्या लोकसभा निवडणुकीत मनसेकडून 11 जागांवर उमेदवार उभे करण्यात आले होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत मनसेने 13 आमदार जिंकले आणि पक्षाला 5.71 टक्के मते मिळाली. त्यामुळे राज ठाकरेंच्या मनसेचा भाजपला किती फायदा होतो हे पाहण्याजोगे असेल.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय निवडणूक आयोगाने तारखांची घोषणा केली आहे. देशात सात तर महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. तर 4 जून रोजी देशभरातील लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.

News Title- Raj Thackeray’s MNS is likely to join the NDA in the run-up to the Lok Sabha elections
महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली! IPL सुरू होण्याआधीच स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर?

‘माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजप…’; सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

‘मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं’; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

भाजपच्या डोक्याला ताप, ‘हा’ नेता ऐकायलाच तयार नाही, अपक्ष लढणार?

सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना दिलासा, चिन्हाबाबत मोठी अपडेट समोर