‘माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजप…’; सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

Sushil Kumar Shinde | आगामी लोकसभा निवडणूक काही दिवसांवर आली आहे. अशातच आता आचारसंहिता लागली आहे. मतदारसंघाच्या तारखा आता समोर आल्या आहेत. काही दिवसांआधी काँग्रेसचे अनुभवी नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसला राम राम करत भाजपचं कमळ हाती घेतलं. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) यांची कन्या प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर आली आहे.

भाजपकडून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रणिती शिंदे यांना भाजपकडून ऑफर आल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी यावर भाष्य केलं आहे. सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्याचं बोललं जात आहे. यावर आता सुशील कुमार (Sushil Kumar Shinde) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले सुशीलकुमार शिंदे?

सोलापूरच्या जागेवर प्रणिती शिंदे यांना घेण्यासाठी भाजपने शेवटपर्यंत प्रयत्न केला आहे. त्यावर प्रणितीने आपलं मत व्यक्त केलं असल्याचं सुशीलकुमार (Sushil Kumar Shinde) म्हणाले आहेत. “मी काँग्रेसशी प्रामाणिक आहे. जी गांधी आणि नेहरूंची काँग्रेस असेल त्यांच्या काँग्रेसमध्ये मी असेल.”

“काँग्रेससाठी काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत, पण ज्यांना जायचं आहे ते जाणार. भाजप प्रवेशाबाबत त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मी सांगू शकत नाही. लोकांनी तिला तीन वेळा निवडून दिलं म्हणून म्हणून ती पार्टी सोडू इच्छित नाही,” असं सुशीलकुमार शिंदे (Sushil Kumar Shinde) म्हणाले.

“भूलथापा देणारा पंतप्रधान दोन वेळा स्विकारला”

“आम्ही आमच्या मनामध्ये स्ट्राँग आहोत. प्रणिती देखील स्ट्राँग आहे. तिला भाजपमध्ये जाणं पटत नसल्याचं सुशीलकुमार म्हणाले आहेत. यावेळी बोलत असताना नरेंद्र मोदी यांची राष्ट्रीय विचारसरणीची भाषा बदलली आहे. लोकांनी असा भूलथापा देणारा पंतप्रधान दोन वेळा स्विकारला आहे. भाजप फक्त मोदी आणि त्यांची गॅरंटी देतात, कसली गॅरंटी ती त्यांनाच माहिती आहे.”

अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यावर भाष्य

राज ठाकरे आणि भाजपमध्ये युती होणार असल्याच्या चर्चा आहेत. अमित शहा आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक झाली असल्याची माहिती आहे. हा पार्टीतल्या निरनिराळ्या चालणाऱ्या प्रोसेसमधला भाग आहे. त्यावर मी भाष्य करणे योग्य नाही, असं सुशीलकुमार म्हणाले आहेत.

News Title – Sushil kumar Shinde Doughter Praniti Shinde Offer BJP

महत्त्वाच्या बातम्या

“मुस्लिमांना 4 बायका ठेवण्याचा हक्क असल्याने हिंदू जळतात”

रोहित पवारांचा राज ठाकरेंना सल्ला, म्हणाले…

‘मला फक्त दिल्लीत…’; राज ठाकरेंची सूचक प्रतिक्रिया

टायगर श्रॉफने पुण्यात खरेदी केलं घर; किंमत ऐकून बसेल धक्का

भावा पाठोपाठ आता वहिनींचाही ‘दादां’ना विरोध, म्हणाल्या ‘शेवटी कुटुंब हे’