मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली! IPL सुरू होण्याआधीच स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर?

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

Mumbai Indians | आयपीएलचा सतरावा हंगाम शुक्रवारपासून सुरू होत आहे. रॉयल चलेंजर्स बंगळुरू आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात सलामीचा सामना होणार आहे. आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सचा पहिला सामना 24 मार्चला गुजरात टायटन्सशी होणार आहे, पण त्याआधीच संघाला मोठा धक्का बसू शकतो. आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ म्हणून मुंबई इंडियन्सची ओळख आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने पाचवेळा किताब जिंकला आहे.

पण, आता प्रथमच मुंबई हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात दिसणार आहे. रोहितला वगळून हार्दिकवर कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामाला सुरुवात होण्याआधीच हार्दिकसेनेची डोकेदुखी वाढली आहे. कारण काही रिपोर्ट्सनुसार, सूर्यकुमार यादवची काल म्हणजेच 19 मार्च रोजी फिटनेस चाचणी होती, ज्यामध्ये तो पास झाला नाही.

स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर?

सूर्यकुमार यादवने इंस्टाग्रामवर ठेवलेली स्टोरी देखील चर्चेचा विषय बनली. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेपासून घोट्याच्या दुखापतीने तो त्रस्त आहे, ज्यासाठी 2024 च्या सुरुवातीला त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.

सूर्यकुमार यादव अनफिट असल्यामुळे पहिल्या काही सामन्यांतून बाहेर राहण्याची शक्यता वर्तवली जात होती. मंगळवारी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) सूर्यकुमार यादवची फिटनेस चाचणी घेण्यात आली. योग्य तपासणी केल्यानंतर डॉक्टर आणि फिजिओने त्याला अद्याप खेळण्याची परवानगी दिली नाही.

Mumbai Indians ची डोकेदुखी वाढली

एनसीए चाचणीत अपयशी ठरल्यानंतर त्याला संपूर्ण मोसमातून बाहेर राहण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. फिटनेस चाचणीत अपयशी ठरल्यानंतर सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर एक पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने ‘हार्ट ब्रोकन’चा इमोजी शेअर करून आपली निराशा व्यक्त केली.

मागील वर्षी डिसेंबरमध्ये झालेल्या ट्वेंटी-20 सामन्यादरम्यान सूर्यकुमार यादव शेवटचा मैदानात दिसला होता. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात त्याने केवळ 56 चेंडूत 100 धावांची खेळी केली. त्याच्या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता.

News Title- Surya Kumar Yadav of Mumbai Indians has failed the fitness test

महत्त्वाच्या बातम्या –

‘माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजप…’; सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

‘मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं’; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

भाजपच्या डोक्याला ताप, ‘हा’ नेता ऐकायलाच तयार नाही, अपक्ष लढणार?

सर्वोच्च न्यायालयाचा शरद पवारांना दिलासा, चिन्हाबाबत मोठी अपडेट समोर

कडक उन्हाळ्यात डिहायड्रेशनपासून ‘असा’ करा स्वतःचा बचाव!