आयकरातून भारत सरकारची बक्कळ कमाई; कर संकलनात तब्बल 20 टक्क्यांनी वाढ!

Income Tax | देशभरातील प्रत्येक नागरिक अथवा कुटुंब आयकर किंवा इतर प्रत्यक्ष कर भरतो. त्यातून सरकारला भरपूर कमाई होते. 2023-24 या आर्थिक वर्षात सरकारने जाहीर केलेल्या प्रत्यक्ष कर संकलनाच्या तात्पुरत्या आकडेवारीवरून असे दिसून येते की, 2022-23 च्या तुलनेत सरकारच्या कर संकलनात 19.88 टक्के अर्थात जवळपास सुमारे 20 टक्के वाढ झाली आहे. दोन्ही आर्थिक वर्षात सरकारी तिजोरीत आलेल्या पैशांची तुलना केली तर 2023-24 मध्ये सरकारच्या कमाईत 3 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

भारत सरकारने पुन्हा एकदा नवा विक्रम केला आहे. 2023-24 या आर्थिक वर्षात आयकर सारख्या प्रत्यक्ष करातून मिळणाऱ्या कमाईत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे. यामुळे मागील आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे 3 लाख कोटी रुपयांची लक्षणीय वाढ झाली आहे.

कर संकलनात चांगली वाढ!

खरं तर सरकारने जाहीर केलेली आकडेवारी 17 मार्चपर्यंतची आहे. तर 2023-24 या आर्थिक वर्षाची अंतिम तारीख 31 मार्च 2024 आहे. नवीन आर्थिक वर्ष 2024-25 हे 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. या स्थितीत सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

दरम्यान, केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) दिलेल्या माहितीनुसार, 17 मार्चपर्यंत सरकारला प्रत्यक्ष कर म्हणून 18,90,259 कोटी रुपये मिळाले आहेत. तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये ही रक्कम 15,76,776 कोटी रुपये होती. अशा प्रकारे सरकारच्या प्रत्यक्ष कर संकलनात 3.13 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

Income Tax मधून बक्कळ कमाई

मागील काही काळापासून अनेकांवर धाड सत्र सुरू आहे. 9,14,469 कोटी रुपये कॉर्पोरेट टॅक्सच्या रूपात सरकारच्या थेट तिजोरीत जमा झाले आहेत. तर सरकारला व्यक्तींकडून वसूल केलेल्या आयकरातून 9,72,224 कोटी रुपये मिळाले आहेत.

आयकर परतावा एकत्र केल्यास सरकारचे एकूण प्रत्यक्ष कर संकलन 22.27 लाख कोटी रुपये होते. 2022-23 च्या एकूण प्रत्यक्ष कर संकलनापेक्षा हे प्रमाण 18.74 टक्के अधिक आहे. सरकारला संपूर्ण आर्थिक वर्षात म्हणजे 31 मार्च 2024 पर्यंत एकूण 19.45 लाख कोटी रुपयांचे कर संकलन अपेक्षित आहे. त्यामुळे पुढील दहा दिवसात आकडेवारीत नक्कीच बदल होईल यात शंका नाही.

News Title- Income Tax Government of India earned good income and tax collection has increased by 20 percent
महत्त्वाच्या बातम्या –

महायुतीत मनसेची ‘जागा’ पक्की? राज ठाकरेंना मुंबईतील एक जागा मिळण्याची शक्यता!

मुंबई इंडियन्सची डोकेदुखी वाढली! IPL सुरू होण्याआधीच स्टार खेळाडू स्पर्धेबाहेर?

‘माझ्या लेकीला पक्षात घेण्यासाठी भाजप…’; सुशील कुमार शिंदेंचा मोठा गौप्यस्फोट

‘मला ग्रेट भेटीचा साक्षीदार होता आलं’; अमित ठाकरेंची पोस्ट चर्चेत

भाजपच्या डोक्याला ताप, ‘हा’ नेता ऐकायलाच तयार नाही, अपक्ष लढणार?