मुंबई | अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी अजित पवार यांचे सख्ये भाऊ श्रीनिवास पवार यांच्यावर टीका केली होती. आज श्रीनिवास पवार बोलत आहेत ते यापूर्वी काही का बोलले नाही? असा सवाल अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांनी केेलेला. यावर उत्तर देताना रोहित पवारांनी (Rohit Pawar) अमोल मिटकरींची लायकी काढली होती.
काय म्हणाले रोहित पवार?
जी भूमिका श्रीनिवास काकांनी मांडली ती भूमिका सामान्य जनतेची आहे. आपल्या काकाला सोडून जाणे हे योग्य नसल्याचे सर्वांना वाटते. त्यामुळे साहेबांच्या विचाराने चालणारे पवार कुटुंब आहे म्हणून आम्ही पवार साहेब सोबत आहोत. अजितदादांनी स्वतः निर्णय घेत स्वतःला पवार कुटुंबापासून वेगळे केले आहे, असं रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.
ज्यांनी श्रीनिवास काकांच्या विरोधात वक्तव्य केलं त्या व्यक्तीची नेमकी काय लायकी आहे, हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे अमोल मिटकरीवर बोलून मी वेळ वाया घालवणार नाही, असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवारांच्या या टीकेला मिटकरींनी उत्तर दिलंय.
मिटकरींचं रोहित पवारांना उत्तर
रोहित पवारांच्या टीकेला अमोल मिटकरींनी जशास तसं उत्तर दिलं आहे. दोन्ही नेत्यांनी एकमेकांची लायकी काढली आहे. मिटकरींनी याबाबत ट्विट केलं आहे.
तु सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलास, दादा जे कष्ट करुन इथवर आलेत ते तुला करायचं काम पडलं नाही. शेतकरी पुत्र म्हणून मरेपर्यंत आम्ही दादासोबत आहोत, असं मिटकरींनी म्हटलंय.
जयंत पाटील साहेब आहेत तोपर्यंत जबाबदारीचे पत्र घेऊन घे कारण तुझी खरी लायकी फक्त त्यांनाच माहित आहे. बालबुद्धी हीच तुझी लायकी, असं मिटकरी म्हणालेत.
महत्त्वाच्या बातम्या-
अजित पवारांनी न्यायालयाची आणि जनतेची माफी मागावी; शरद पवार गट आक्रमक
पुण्यात सरकारी नोकरीची संधी! 15 एप्रिलपर्यंत अर्ज करता येणार
यंदाच्या वर्षी प्राईम व्हिडिओवर मिळणार मनोरंजनाची मेजवानी; रिलीज होणार 70 चित्रपट-वेबसिरीज
आमलकी एकादशीला चुकूनही या गोष्टी करू नका; जाणून घ्या शुभ मुहूर्त
दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचा अभिमानच; पाकिस्तानच्या माजी खेळाडूचा मोठा खुलासा